Share Market
Share Market 
अर्थविश्व

Share Market : भांडवली बाजार कोसळला; सेन्सेक्स तब्बल 3.80 व निफ्टी 3.76 टक्क्यांनी घसरला

दैनिक गोमन्तक

देशातील भांडवली बाजाराने आज चालू आठवड्याच्या शेवटच्या सत्रव्यवहारात मोठी आपटी नोंदवली आहे. देशातील दोन्ही निर्देशकांनी या आठवड्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बाजार व्यवहारात तेजी नोंदवली होती. मात्र त्यानंतर आज दोन्ही निर्देशांक गडगडल्याचे पाहायला मिळाले. काल गुरुवारच्या व्यवहाराच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सकाळी 782.6 अंकांनी घसरत 50,256.71 वर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक देखील 208.4 अशांनी खाली येत 14,888.60 वर उघडला. त्यानंतर संपूर्ण दिवसभराच्या व्यवहारात दोन्ही निर्देशकांनी मोठी घसरण नोंदवली. व त्यासह बीएसईने 50 हजाराचा आणि एनएसईने 15 हजाराचा स्तर सोडला. आज देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर मार्केटचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1939.32 अशांनी खाली येत 49,099.99 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 568.20 अंकांनी घसरत 14,529.15 या स्तरावर बंद झाला. 

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात आज सेन्सेक्स एकाच व्यवहारात 3.80 टक्क्यांनी खाली आला. तर निफ्टीने देखील 3.76 टक्क्यांनी आपटी नोंदवली. कालच्या सत्रात दोन्ही निर्देशकांनी तेजी नोंदवली होती. काल शुक्रवारी मुंबई स्टॉक मार्केटच्या निर्देशांकाने 257.62 अशांची बढत घेत 51 हजाराची पातळी गाठत 51,039.31 वर पोहचला होता. आणि निफ्टी निर्देशांकाने 115.35 अंकांची बढत नोंदवत 15 हजाराचा टप्पा ओलांडत 15,097.35 वर बंद झाला होता. तर याअगोदर आठवड्याच्या पहिल्या सत्र व्यवहारात म्हणजेच सोमवारी दोन्ही निर्देशांकांनी मोठी सत्र आपटी नोंदवली होती. सोमवारी सेन्सेक्स 2.25 टक्क्यांनी घसरत 49,744.32 वर बंद झाला होता. यावेळी सेन्सेक्सने 1,145.44 अंकाने खाली आला होता. व निफ्टी 2.04 टक्क्यांनी खाली येत 14,675.70 पोहचला होता. निफ्टीने एकाच सत्रात 306.05 अनेक गमावले होते.  

मुंबई शेअर बाजारातील ओएनजीसी, इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, बजाज ऑटो, एचसीएल टेक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी, सन फार्मा, टीसीएस, डॉक्टर रेड्डीज, एशियन पेंट, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, टायटन, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा,  बजाज फायनान्स आणि पॉवरग्रिड यांचे शेअर्स आज घसरले. 

आज जगातील सर्वच भांडवली बाजारांनी घसरण नोंदवल्याचे पाहायला मिळाले. आणि त्याचाच परिणाम म्हणून देशातील शेअर बाजार देखील खाली आला असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. अमेरिकेचा डॉवजोन्स 1.75, चीनचा शांघाय कॉम्पोझिट 2.47, हॉंगकॉंगचा हॅन्ग सॅन्ग 3.64, जपानचा निक्केई 3.99 टक्क्यांनी खाली आला आहे. याशिवाय जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्सच्या भांडवली बाजारांनी देखील घसरण नोंदवली आहे.            

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT