Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2023 Expectations: नोकरदारांसाठी मोठी खूशखबर! आता एवढ्या लाखापर्यंत भरावा लागणार आयकर

Budget 2023 Expectations Income Tax: नवीन वर्षाची सुरुवात होताच आगामी अर्थसंकल्पाचीही चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Budget 2023 Expectations Income Tax: नवीन वर्षाची सुरुवात होताच आगामी अर्थसंकल्पाचीही चर्चा सुरु झाली आहे. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होऊन 6 एप्रिलपर्यंत चालण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वेळी 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करतील अशी अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पाकडून प्राप्तिकरदात्यांना मोठ्या आशा आहेत. पगारदारांना आशा आहे की, मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा देण्याबरोबरच आयकर स्लॅबमध्येही बदल केले जातील.

जास्त पैसे खर्च करता येणार

आयएएनएसच्या अहवालातील सूत्रांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, यावेळी आयकर सूट मर्यादा 2.5 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये केली जाऊ शकते. जर सरकारने (Government) हे पाऊल उचलले तर लोकांकडे खर्च करण्यासाठी अधिक पैसे असतील. यामुळे आगामी काळात पैसे खर्च करण्यास प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. हे पाऊल गुंतवणुकीलाही प्रोत्साहन देईल.

अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंत सूट

सध्या 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सरकारला कोणताही आयकर भरावा लागत नाही. 60 ते 80 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तीन लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत ही सूट मिळते. त्याचवेळी, 80 वर्षांवरील अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सूट मर्यादा 5 लाख रुपये आहे.

तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 21 नोव्हेंबर रोजी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत सुरु केली होती. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारीही सहभागी झाले होते. यावेळी आयकर सूट मर्यादा वाढविण्यावरही चर्चा झाली. याशिवाय यावेळी 80C अंतर्गत उपलब्ध गुंतवणुकीची मर्यादाही वाढवली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT