BMW Cars In India Dainik Gomantak
अर्थविश्व

BMW Cars In India: Fortunerच्या किमतीत खरेदी करा 'BMW'च्या या लक्झरी कार, फीचर्स आणि डिझाइन पाहून थक्क व्हाल

Affordable BMW cars India: जर तुम्ही ४५ लाख ते ६५ लाख रूपये या बजेटमध्ये एक प्रीमियम, स्टायलिश आणि परफॉर्मन्स-ओरिएंटेड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, याच बजेटमध्ये BMW सारखी कार खरेदी करू शकतो.

Sameer Amunekar

जर तुम्ही ४५ लाख ते ६५ लाख रूपये या बजेटमध्ये एक प्रीमियम, स्टायलिश आणि परफॉर्मन्स-ओरिएंटेड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमचं लक्ष फक्त टोयोटा फॉर्च्युनर या एका गाडीपुरतं मर्यादित ठेवण्याची गरज नाही. कारण, याच बजेटमध्ये BMW सारख्या जर्मन लक्झरी ब्रँडकडूनही अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

BMW इंडिया सध्या देशात सुमारे २२ मॉडेल्स ऑफर करते. त्यापैकी काही गाड्यांच्या किंमती फॉर्च्युनरच्या सुरुवातीच्या किंमतीपेक्षाही कमी आहेत, तर काही किंमती थोड्या जास्त असल्या तरी त्यात मिळणारा लक्झरी अनुभव अधिक प्रीमियम आहे. चला पाहूया फॉर्च्युनरच्या बजेटमध्ये येणाऱ्या BMW च्या टॉप ४ गाड्यांबद्दल.

BMW 2 Series Gran Coupe (किंमत – 44.40 लाख पासून)

ही एक स्टायलिश आणि स्पोर्टी कूप बॉडी स्टाईल असलेली कार आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिन प्रकारांमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. स्पोर्टी लूक, कंबाइन केलेली पॉवर आणि प्रीमियम इंटीरियर या वैशिष्ट्यांमुळे ही गाडी विशेषतः तरुण आणि शहरी ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

वैशिष्ट्ये: स्पोर्ट्स ट्युनिंग, अॅग्रेसिव्ह लूक, iDrive इन्फोटेन्मेंट सिस्टीम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल

BMW X1 (किंमत – 50.80 लाख पासून)

BMW X1 ही एक कॉम्पॅक्ट लक्झरी SUV आहे. SUV लुक, अधिक जागा आणि फीचर्स असलेल्या या गाडीमध्ये ADAS, पॅनोरॅमिक सनरूफ आणि मोठी बूट स्पेस यासारखी वैशिष्ट्ये आहेत.

वैशिष्ट्ये: ड्रायव्हिंग असिस्टंट, अॅक्टिव्ह क्रूझ कंट्रोल, पाच सीटिंग कॉन्फिगरेशन, पेट्रोल/डिझेल इंजिन पर्याय

BMW 3 Series Sedan (किंमत – 62.00 लाख पासून)

BMW 3 सीरिज ही जगभरात प्रसिद्ध असलेली ड्रायव्हर-केंद्रित सेडान आहे. अत्यंत शार्प हँडलिंग, उत्कृष्ट इंजिन परफॉर्मन्स आणि प्रीमियम फिनिश ही या गाडीची खासियत आहे.

वैशिष्ट्ये: 0-100 किमी/तास वेळ: 6 सेकंदाच्या आसपास, 3D नेविगेशन सिस्टम, इंटिग्रेटेड डिजिटल डिस्प्ले, स्पोर्टी डायनॅमिक मोड

BMW 3 Series Gran Limousine (किंमत – 62.00 लाख पासून)

ही कार 3 सीरिज पेक्षा लांब व्हीलबेस असलेली प्रीमियम लिमोझिन आवृत्ती आहे. मागील प्रवाशांसाठी अधिक पायजागा आणि प्रीमियम सीटिंग एक्सपीरियन्स देणारी ही गाडी खासकरून कार बॅकसीटवरून एंजॉय करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाईन करण्यात आली आहे.

वैशिष्ट्ये: एन्हान्स्ड रियर सीट कम्फर्ट, हरमन कार्डन साउंड सिस्टीम, लार्जर सनरूफ, लक्झरी फिनिश इंटीरियर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Bull Fight Viral Video: रस्त्यावर जनावरांचा थरार अन्...! बैलाची स्कूटीला जोरदार धडक; अंगावर काटा आणणार व्हिडिओ तूफान व्हायरल

Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

SCROLL FOR NEXT