BIS Recruitment 2022 | Latest Government Jobs Dainik Gomantak
अर्थविश्व

BIS Recruitment 2022| BIS मध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू; 10वी ते PG पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

भारतीय मानक ब्युरोमध्ये बंपर भरतीची अंतिम तारीख 9 मे आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय मानक ब्युरो (BIS) भारत सरकारच्या अंतर्गत, गट A, B आणि C पदांवर बंपर पदभरती सुरू झाली आहे. ही पदभरती आज म्हणजेच 19 एप्रिल 2022 रोजीपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मे 2022 आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट bis.gov.in वर जावे. याशिवाय, ऑनलाइन अर्ज देखील करता येणार आहे. (BIS Recruitment 2022 News)

भारतीय मानक ब्युरोमध्ये एकूण 337 रिक्त जागासाठी पदभरती करण्यात येत आहे. ज्यामध्ये असिस्टेंट डायरेक्टर आणि डायरेक्टर, असिस्टेंट सेक्शन ऑफिसर, पर्सनल असिस्टेंट आणि स्टेनोग्राफर, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रीशियन या पदांचा समावेश आहे.

डायरेक्टर : 1

असिस्टेंट डायरेक्टर : 3

पर्सनल असिस्टेंट : 28

पर्सनल असिस्टेंट ऑफिसर : 47

असिस्टेंट (कॉम्प्युटर एडेड डिझाइन): 2

स्टेनोग्राफर: 22

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक: 100

फलोत्पादन पर्यवेक्षक : 1

तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा): 47

सीनियर टेकनेशिअन पोस्ट 25

* शैक्षणिक पात्रता
भारतीय मानक ब्युरोमध्ये 10वी पास ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. पदासंबंधित पात्रता पाहून उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार आहे.

* अर्ज करण्याची फी
भारतीय मानक ब्युरोमधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रु. शुल्क भरावे लागेल. तसेच असिस्टेंट डायरेक्टर पदाकरीता अर्ज करण्यासाठी 800 रु. भरावे लागतील. अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख देखील 9 मे 2022 आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तर पर्यटक पुन्हा गोव्यात येणार नाहीत! टॅक्सीभाडयावरील प्रश्नावरून मंत्री गुदिन्हो यांचा इशारा; ओला-उबेरला थारा देणार नसल्याची स्पष्टोक्ती

Goa Politics: खरी कुजबुज; पालेकर सुदिनना अडकवणार?

Goa Politics: सरदेसाई यांनी ‘आम्हांला संशय आहे,‘ असे वक्तव्य केले, त्यामुळे आपले मन दुखावले; ॲड. अमित सावंतांचा गौप्यस्फोट

Goa Mineral E Auction: गोवा सरकारच्या तिजोरीत 136 कोटींचा महसूल! 7.48 लाख मेट्रिक टन खनिजाच्या ई-लिलावातून परतावा

Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

SCROLL FOR NEXT