Ashwini Vaishnaw Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Train: वंदे भारत आता बिहारमधून धावणार; मंत्रिमहोदयांनी सांगितली योजना!

Indian Railways: रेल्वे मंत्रालयात सुरु असलेल्या चर्चेनुसार बिहारच्या लोकांनाही लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसची भेट मिळू शकते.

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Express Train: दक्षिण भारतानंतर, रेल्वे लवकरच बिहारमध्येही सेमी हायस्पीड ट्रेन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विचार करत आहे. रेल्वे मंत्रालयात सुरु असलेल्या चर्चेनुसार बिहारच्या लोकांनाही लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसची भेट मिळू शकते. वाराणसीतून आणखी एक वंदे भारत सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही ट्रेन पाटणामार्गे कोलकात्याला जाऊ शकते.

ट्रेन कोणत्या मार्गावर धावू शकते?

रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्स्प्रेस बिहारमधून (Bihar) धावणे अपेक्षित आहे. सध्या वाराणसी ते हावडा मार्गे पाटणा या मार्गावर ट्रेन चालवण्याची चर्चा सुरु आहे. याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

पंतप्रधानांनी 5 व्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

अलीकडेच, पंतप्रधान मोदींनी पाचव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन चेन्नई (Chennai) ते म्हैसूर दरम्यान बंगळुरुमार्गे धावत आहे. ही ट्रेन 483 किलोमीटरचा प्रवास करते.

या मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहे

देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन दिल्ली ते वाराणसी दरम्यान सुरु झाली. दिल्ली ते कटरा या दुसऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. मुंबई ते अहमदाबाद (Ahmedabad) दरम्यान तिसरी वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. चौथी वंदे भारत दिल्ली ते उना (Himachal) दरम्यान सुरु झाली आहे. आता ही पाचवे वंदे भारत असेल, ज्याला पीएम मोदी हिरवा झेंडा दाखवतील.

75 गाड्या चालवल्या जातील

सहारनपूर दौऱ्याची माहिती देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'वंदे भारत एक्सप्रेस सहारनपूर-दिल्ली मार्गावरही चालवली जाईल.' रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी उनाहून निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास केला होता. प्रवासानंतर 180 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या वेगाची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 75 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याची पंतप्रधान मोदींची योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Dance: सूर्याचा 'धुरंधर' अवतार! अक्षय खन्नाच्या 'सिग्नेचर' स्टेपवर धरला ठेका; धमाकेदार डान्सवर चाहते फिदा VIDEO

Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Leopard in Camurlim: कामुर्लीत बिबट्याचा वावर; वासराची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Horoscope: एप्रिल 2026 मध्ये कोणाला मिळणार कुटुंबाची साथ? कोणाची होणार ताटातूट? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

SCROLL FOR NEXT