Baba Ramdev Dainik Gomantak
अर्थविश्व

11000000000 कोटींची डील! बाबा रामदेव यांच्या पतंजलीबाबत मोठी अपडेट; कोण विकत घेतय दंत आणि केश कांती?

Patanjali Foods Share: बाबा रामदेव यांच्या पतंजलीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Manish Jadhav

बाबा रामदेव यांच्या पतंजलीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर, बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील 'होम अॅण्ड पर्सनल केयर’ उद्योग लिस्टेड ग्रुप कंपनी पंतजली फूड्स लिमिटेडला 1,100 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. HPC उद्योगाच्या अधिग्रहणाच्या प्रस्तावाला मंजूरीही देण्यात आली आहे. यामुळे या उद्योगाचे अग्रगण्य FMCG कंपनीत रुपांतर होण्यास गती मिळेल.

देशभरात करोडो ग्राहक आहेत

PAL होम पर्सनल केअर उद्योगाची सध्या भारतातील (India) FMCG क्षेत्रात मजबूत ब्रँड इक्विटी आहे आणि देशभरात लाखो ग्राहक आहेत. या HPC उद्योगात सध्या चार प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे - डेंटल केअर, स्किन केअर, होम केअर आणि हेअर केअर. HPC व्यवसायाच्या संपादनाचा हा धोरणात्मक पुढाकार कंपनीच्या सध्याच्या FMCG उत्पादन पोर्टफोलिओला प्रतिष्ठित ब्रँडच्या श्रेणीसह मजबूत करेल आणि महसूल आणि EBITA वाढीस देखील हातभार लावेल.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून यासंबंधीच्या बातम्या येत होत्या मात्र आता या अधिग्रहणाची पुष्टी झाली आहे. खुद्द बाबा रामदेव यांच्याकडून या अधिग्रहणासंबंधी सांगण्यात आले.

हा प्लॅन काय आहे?

PFL PAL चा संपूर्ण HPC व्यवसाय घेण्यास सज्ज आहे. यामध्ये व्यवसायाशी संबंधित सर्व मालमत्ता आणि दायित्वे, संबंधित कर्मचारी, वितरक नेटवर्क, करार, परवाने, परवानग्या, संमती आणि या ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या मंजूरी यांचा समावेश आहे. अधिग्रहण हे विविध अटींच्या पूर्ततेच्या अधीन आहे जे प्रामुख्याने व्यवसाय उपक्रमाच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या नियामक मंजूरी आहेत.

व्यवसाय हस्तांतरणासाठी ही डीलची रक्कम

HPC व्यवसायाच्या हस्तांतरणासाठी कंपनी आणि PAL 11,00,00,00,000 रुपयांची एकरकमी वाटाघाटी करण्यात आली आहे. कंपनी आणि PAL यांच्यात 3% उलाढालीवर आधारित शुल्क आणि इतर अटींसह स्वतंत्र परवाना व्यवस्था मान्य करण्यात आली आहे.

या संपादनासह कंपनीने असेही म्हटले आहे की, तिने FMCG क्षेत्रातील एक प्रमुख प्लेयर बनण्याच्या प्रवासात एक मजबूत FMCG कंपनी होण्याच्या स्थितीची पुष्टी केली आहे. PFL बोर्डाच्या मान्यतेनुसार, कंपनी आता संपादनासंदर्भात निश्चित करार अंमलात आणण्यासाठी तसेच व्यवहारासाठी आवश्यक मंजुरीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

SCROLL FOR NEXT