Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून मिळणार 'हे' दोन मोठे लाभ; पगारवाढीत होणार बंपर वाढ!

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात सरकारकडून त्यांना मोठा लाभ मिळू शकतो.

Manish Jadhav

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात सरकारकडून त्यांना मोठा लाभ मिळू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (DA) पुढील महिन्यापासून पासून वाढ केली जाऊ शकते.

जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवला जातो. शेवटची दरवाढ मार्च 2023 मध्ये जाहीर करण्यात आली होती, जी 1 जानेवारी 2023 पासून लागू झाली होती. दरवाढीमध्ये डीए 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के करण्यात आला आहे.

अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही

सध्या, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. रिपोर्टनुसार, केंद्र सरकार 1 जुलैपासून महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर करु शकते, त्यानंतर डीए 46 टक्के होईल.

मात्र, अद्यापपर्यंत डीए वाढीबाबत सरकारकडून (Government) कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. चालू आर्थिक वर्षात सरकार डीए वाढवण्याची ही पहिलीच वेळ असेल.

डीए आणि डीआर 4 टक्क्यांनी वाढू शकतात

सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो, तर पेन्शनधारकांना महागाई सवलत दिली जाते. अधिकृत आकडेवारीनुसार, 47.58 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना आगामी डीए वाढीचा फायदा होणार आहे.

AICPI नुसार कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारात 3 ते 4 टक्के वाढ होऊ शकते. तथापि, ते मे-जूनच्या आकडेवारीवर देखील अवलंबून असेल, जे चांगले असल्यास, 4 टक्के महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवू शकते.

याप्रमाणे पगाराची गणना समजून घ्या

जर एखाद्या कर्मचाऱ्याला दरमहा 20,000 रुपये पगार मिळत असेल, तर 42% DA नुसार तो 8,400 रुपये होतो. त्याचवेळी, डीए 46 टक्के नुसार 9,200 रुपये असेल. अशा प्रकारे, दरमहा पगारात 720 रुपये आणि वार्षिक 99,360 रुपयांची वाढ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Today's News Live: सायबर क्राईम रोखण्यासाठी गोवा पोलिस अलर्ट, 152 मोबईल नंबर केले ब्लॉक

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

SCROLL FOR NEXT