Big Increase In Doctor's conveyance Allowance Dainik Gomantak
अर्थविश्व

डॉक्टरांच्या वाहतूक भत्त्यात मोठी वाढ

केंद्र सरकारच्या अंतर्गत CGHS युनिट्समधील काम करणाऱ्या केंद्रीय आरोग्य सेवा व डॉक्टरांसाठी वाहतूक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: डॉक्टरांच्या संदर्भात केंद्र सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. कार चालवणाऱ्या तसेच दुचाकी आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या डॉक्टरांच्या भत्त्यांमध्ये सरकारने मोठी वाढ केली आहे. आता डॉक्टरांना जास्तीत जास्त 7150 रुपये प्रति महिना भत्ता मिळणार आहे.डॉक्टरांच्या (Doctor)वाहतूक भत्त्यात मोठी वाढ केली आहे. विशेषत: अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर दुचाकी आणि सार्वजनिक वाहतुकीने चालणाऱ्या डॉक्टरांच्या भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या (Central Government)अंतर्गत CGHS युनिट्समधील रुग्णालये,फार्मसी,स्टोअरमध्ये काम करणाऱ्या केंद्रीय आरोग्य सेवा डॉक्टरांसाठी वाहतूक भत्त्याचा दर विचाराधीन होता. आता केंद्रीय आरोग्य सेवेतील डॉक्टरांना प्रतिमहिना वाहतूक भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, प्रत्येक वेळी महागाई भत्त्यात 50 टक्क्यांनी वाढ केल्यावर वाहतूक भत्त्याची रक्कम 25 टक्क्यांनी वाढेल.

20 वेळा यावे लागणार हॉस्पिटल मध्ये

प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याने महिन्यातून किमान सरासरी 20 वेळा हॉस्पिटलला येणे आवश्यक आहे. परंतू एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची रुग्णालयात येण्याची संख्या 20 च्या कमी आणि 6 पेक्षा जास्त आहे तेथे वाहतूक भत्त्यात कपात होणार आहे. ही कपात किमान 375 रुपये, 175 रुपये आणि 130 रुपये प्रति महिना असेल.जर रुग्णालयात भेटींची संख्या सहापेक्षा कमी असेल तर कोणताही भत्ता मिळनार नाही.

वेतन बिलासह सादर करावे लागेणार प्रमाणपत्र

वाहन भत्त्याची मागणी करणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याला मासिक वेतन बिलासह सर्व अटी पूर्ण करत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ड्युटीवर किंवा रजेवर असताना किंवा कोणत्याही तात्पुरत्या बदलीदरम्यान वाहतूक भत्ता स्वीकारल्या जाणार नाही. जे वैद्यकीय अधिकारी कार किंवा गाडी वापरत नाही किंवा सर्वात कमी दराने वाहतूक भत्ता काढत आहेत त्यांनाही वेतन बिलासह प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

हे दैनिक भत्ता मिळण्यास नसणार पात्र

CGHS अंतर्गत डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल (Hospital)आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या बाबतीत, या आदेशानुसार ज्यांना अनेक पदांचे वाटप करण्यात आले आहे त्यांचाच वाहतूक भत्ता स्वीकारला जाईल. शहराच्या महानगरपालिका हद्दीतील 8 किमी किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावरून प्रवास करत असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना कोणताही दैनिक भत्ता घेण्यास पात्र असणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

Goa Language Politics: गोमंतकीय भाषावादाची वृद्धावस्थेकडे वाटचाल? 'राजभाषा करा नाहीतर खुर्ची खाली करा'नंतरही निर्धार समितीचा तिसरा पर्याय कुठे हरवला?

SCROLL FOR NEXT