Big blow to Vijay Mallya kingfisher office sold for 52 crore Dainik Gomantak
अर्थविश्व

अखेर किंगफिशरचा लिलाव, विजय माल्याला मोठा झटका

विजय मल्ल्याने(Vijay Mallya) स्थापन केलेल्या दिवाळखोर विमान कंपनीचे (Kingfisher) पूर्वी असेलेले मुख्यालय एका खाजगी कंपनीला 52 कोटी रुपयांना विकले गेले आहे.

दैनिक गोमन्तक

विजय मल्ल्याने(Vijay Mallya) स्थापन केलेल्या दिवाळखोर विमान कंपनीचे (Kingfisher) पूर्वी असेलेले मुख्यालय एका खाजगी कंपनीला 52 कोटी रुपयांना विकले गेले आहे.अनेक वर्षांपासून अनेक लिलाव आयोजित करूनही या इमारतीला योग्य किंमत मिळत नसल्याने या फिक्स किमतीला त्याची विक्री करण्यात आले असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या अगोदरचे जवळपास या इमारतीच्या विक्रीचे 11 लिलाव फसले होते. (Big blow to Vijay Mallya kingfisher office sold for 52 crore)

रिअल इस्टेट उद्योगाच्या तज्ञांच्या मते, बँकांनी मूळतः अवास्तव राखीव किंमत निश्चित केली होती कारण या मालमत्तेला अनेक मर्यादा होत्या. त्यातच हि इमारत मुंबई विमानतळाच्या बाहेरील भागात असल्याने ती मालमत्ता विकसित करण्यास फारसा वाव नाही.इमारतीमध्ये तळघर, तळमजला, वरचा तळमजला आणि वरचा मजला, एकूण 1,586 चौरस मीटरचा समावेश असून या इमारतीची एकूण जागा 2,402 चौरस मीटर इतकी आहे.

यापूर्वी कर्जाची रकम वसूल करण्यासाठी ईडीने जुलै महिन्यात भारतीय स्टेट बँकच्या नेतृत्वाखालील याच प्रकरणी किंगफिशर एअरलाइन्सचे शेअर्स विकून 792.11 कोटी रुपये वसूल केले होते. देश सोडून पळून गेलेल्या मद्य व्यवसायी विजय माल्याने देशातील 13 बँकांची 9,432 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याने त्याला फरार घोषित केले आहे.

यामध्ये सर्वात जास्त कर्ज SBI बँकेने दिले असून ती रक्कम 1600 कोटी इतकी आहे . त्यानंतर पीएनबी बँक 800 कोटी, आयडीबीआय बँक 650 कोटी आणि त्यांनतर बँक ऑफ बडोदाचा नंबर लागतो. मल्ल्या सध्या लंडनमध्ये राहतो आणि सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. लंडनच्या न्यायालयात हे प्रकरण सुरू असून काही दिवसांपूर्वीच लंडन कोर्टाने त्याला दिवाळखोर घोषित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT