BEL Recruitment 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

​​BEL Recruitment 2022: भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये 'सीनियर असिस्टेंट इंजीनियर' पदासाठी भरती सुरू

BEL Recruitment 2022: उमेदवार 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

दैनिक गोमन्तक

भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) ने सिनिअर असिस्टेंट इंजिनिअर पदांसाठी भरती सुरू आहे.यासाठी उमेदवार BEL च्या अधिकृत वेबसाइट bel-india.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर आहे.

* रिक्त जागा

या भरती मोहिमेद्वारे BEL मध्ये वरिष्ठ सहाय्यक अभियंता पदाच्या 6 जागा रिक्त आहेत.

* आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.

* वेतन

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 30 हजार रुपये ते 1 लाख 20 हजार प्रति महिना पगार दिला जाईल.

निवडलेल्या उमेदवारांना बीईएल विशाखापट्टणम, मुंबई (Mumbai) , कोलकाता येथे पोस्ट केले जाईल.

* निवड अशा प्रकारे केली जाईल

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत, वैद्यकीय चाचणी या आधारे केली जाईल.

* अर्ज कसा करावा

स्टेप १ : सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम bel-india.in या BEL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

स्टेप २: त्यानंतर उमेदवार वरिष्ठ सहाय्यक अभियंता भर्तीच्या लिंकवर क्लिक करावे.

स्टेप ३: उमेदवारांनी दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचावी.

स्टेप ४: त्यानंतर उमेदवार BEL भर्ती 2022 साठी अर्ज भरावा.

स्टेप ५: अर्जामध्ये विचारलेले सर्व तपशील भरावे.

स्टेप ६: उमेदवार फॉर्म सबमिट केल्यानंतर,तो डाउनलोड करा.

स्टेप ७: शेवटी, उमेदवारांनी अर्जाची प्रिंट आउट देखील घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT