Jobs in Goa  Dainik Gomantak
अर्थविश्व

​​BEL Jobs 2022: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 43 पदासाठी भरती सुरू, जाणुन घ्या निवड प्रक्रिया

BEL Recruitment 2022: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे अभियंता पदांसाठी भरती सुरू असुन निवडलेल्या उमेदवारांना खूप चांगले वेतन पॅकेज मिळेल.

दैनिक गोमन्तक

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार BEL प्रकल्प इंजीनियर पदांसाठी भरती करणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत साइट bel-india.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जून 2022 आहे. (bel jobs 2022 bel recruitment 2022 bel bharti 2022 news)

या भरतीद्वारे इंजीनियर (Engineer) पदाच्या 43 जागांसाठी भरती केली जाणार आहे. 16 पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 11 पदे ओबीसीसाठी, 5 पदे आर्थिक दुर्बल घटकासाठी, 7 पदे एससी प्रवर्गासाठी आणि 4 पदे एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

* शैक्षणिक पात्रता

या भरतीकरिता अर्जदाराने किमान 55% गुणांसह संबंधित विषयातील बीई / बीटेक पदवी असणे आवश्यक आहे.

* वयोमर्यादा
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

* पगार
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी 40 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 45 हजार रुपये, तिसऱ्या वर्षी रुपये 50 हजार आणि चौथ्या वर्षी 55 हजार रुपये वेतन दिले जाईल.

* अर्ज फी
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 400 रुपये शुल्क भरावे लागेल.

* अर्ज करा
उमेदवार बीईएलच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या Google फॉर्मच्या लिंकवरून या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT