Bank Holiday Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Holidays in May 2022: 9 दिवस बॅंकांना सुट्टी, 22 दिवसच होणार व्यवहार

बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण मे महिन्यात महाराष्ट्रात बॅंकांना नऊ दिवस सुट्टी असणार आहे.

दैनिक गोमन्तक

बँकशी (Bank) संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण मे महिन्यात महाराष्ट्रात बॅंकांना नऊ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Bank of India) बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली. संपूर्ण मे महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहणार आहेत. त्यामुळेच त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. करोना (Corona) काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइनच सुरू आहेत. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्यावी. (Bank Holidays in May 2022 9 days bank holiday only 22 days of transactions)

1 मे : महाराष्ट्र दिन, कामगार दिवस आणि रविवार असल्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बॅंकेला सुट्टी असणार आहे.

3 मे : रमजान ईद असल्याने यादिवशी बॅंक बंद राहील.

8 मे : रविवार असल्याने यादिवशी बॅंकेला साप्ताहिक सुट्टी असेल.

14 मे : शनिवार साप्ताहिक सुट्टी

15 मे : रविवार साप्ताहिक सुट्टी

16 मे : बुद्ध पौर्णिमा असल्याने या दिवशी बॅंकेला सुट्टी असणार आहे.

22 मे : रविवार असल्याने यादिवशी बॅंकेला साप्ताहिक सुट्टी असेल.

28 मे : शनिवार साप्ताहिक सुट्टी

29 मे : रविवार साप्ताहिक सुट्टी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT