Ban on online medicine sales Dainik Gomantak
अर्थविश्व

ऑनलाईन औषध विक्रीवर येणार बंदी? जाणून घ्या CAITची मागणी

देशातील औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालण्याची मागणी व्यापारी संघटना CAIT ने सरकारकडे केली आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालण्याची मागणी व्यापारी संघटना CAIT ने सरकारकडे केली आहे. ही मागणी अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने 6 एप्रिल रोजी ऑनलाईन माध्यमातून औषधांची (Medicines) विक्री करण्याची घोषणा केली होती.

औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालण्याची कॅटची मागणी

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी या संदर्भात वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र देखील लिहिले आहे. पत्रात, CAIT ने देशातील औषधांच्या ऑनलाईन विक्रीसाठी ई-फार्मसी कंपन्यांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.

मागणीमागचे कारण स्पष्ट

औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा आणि नियम (DC Act and Rules) मधील तरतुदींचे पूर्णपणे पालन करता यावे यासाठी ही मागणी केल्याचे संघटनेने म्हटले आहे. CAITचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, DC कायदा आणि नियम देशात औषधांची आयात, उत्पादन, विक्री आणि वितरण नियंत्रित करतात. तसेच सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी कठोर तरतुदी आहेत.

कायद्याचे उल्लंघन नाही

भारतीय कायद्यातील मध्यस्थ तरतुदींचा फायदा घेण्यापासून त्यांना रोखण्यासाठी ई-फार्मसी कंपन्यांवर बंदी घालण्याची विनंतीही त्यांनी सरकारला केली आहे. ऑनलाईन कंपन्यांकडून औषधांच्या विक्रीशी संबंधित कायद्यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, औषधांच्या विक्रीशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन होता कामा नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT