CNG Cars Twitter
अर्थविश्व

CNG Cars: मारुती-टोयोटाची ग्राहकांना खास भेट, Baleno-Glanza CNG कार लवकरच मार्केटमध्ये येणार

येत्या महिन्यांत, देशातील ऑटोमोबाईल बाजारात काही मोठ्या कार लॉन्च होणार आहेत. ज्यामध्ये हॅचबॅक सेगमेंटमध्ये तीन मॉडेल्स लॉन्च होणार

दैनिक गोमन्तक

Upcoming CNG Hatchback Cars: पुढील काही महिन्यांत, देशातील ऑटोमोबाईल बाजारात काही मोठ्या कार लॉन्च होणार आहेत. ज्यामध्ये हॅचबॅक सेगमेंटमध्ये तीन मॉडेल्स लॉन्च होणार अशी चर्चा आहे. यामध्ये मारुतीच्या न्यू जनरेशन मारुती अल्टो (New Generation Maruti Alto), मारुती बलेनो सीएनजी (Maruti Baleno CNG) आणि टोयोटा ग्लान्झा सीएनजी (Toyota Glanza CNG) या कारचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये काय खास आहे ते जाणून घेवूया.

New Generation Maruti Alto

कंपनी 18 ऑगस्ट 2022 रोजी मारुतीच्या अत्यंत लोकप्रिय हॅचबॅक अल्टोची नवीन अद्ययावत नवीन जनरेशन अल्टो रिलीज बाजारात आणणार आहे. ही कार सर्व-नवीन इंजिन आणि अप-मार्केट इंटीरियरसह अधिक चांगल्या शैलीत येईल. मारुती सुझुकी, त्याच्या इतर नवीन कार्सप्रमाणे, लाइट हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर 2022 मारुती अल्टो (2022 Maruti Alto) तयार करत आहे. यात 1.0-लिटर K10C DualJet इंजिन दिले जाऊ शकते जे 67bhp पॉवर आणि 89Nm टॉर्क जनरेट करू शकते. यामध्ये या नवीन कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते, ज्यामध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि नवीन डिझाइन डॅशबोर्ड आणि अपडेटेड सेंट्रल कन्सोल यांचा समावेश असेल. मारुती अल्टोचे सीएनजी व्हेरियंट देखील लॉन्च करू होण्याची शक्यता आहे.

Baleno and Glanza CNG

मारुती येत्या काही महिन्यांत त्याच्या प्रसिद्ध बॅलेनो हॅचबॅकची CNG कार लॉन्च करू शकते, परंतु त्याची लॉन्च तारीख अद्याप घोषित केलेली नाही. या कार सोबतच टोयोटा Glanza चे CNG व्हेरियंट बाजारात येणार आहे. या दोन्ही कार 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन फॅक्टरी फिट सीएनजी किटसह लॉन्च केल्या जातील. हे गॅसोलीन इंजिन 89 PS कमाल पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कार 22 kmpl (ARAI-प्रमाणित) पेक्षा जास्त मायलेज देते.

या दोन्ही कार त्यांच्या CNG प्रकारांमध्ये 25 kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असतील परंतु पॉवर आणि टॉर्क पेट्रोल मॉडेलपेक्षा किंचित कमी असू शकतात. Baleno आणि Glanza चे CNG प्रकार फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतील. सीएनजी किटचा पर्याय फक्त लोअर आणि मिड-स्पेक व्हेरियंटमध्ये उपलब्ध असण्याची ग्राहकांना अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT