Anil Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

Anil Ambani: कर्जात बुडालेली कंपनी खरेदी करण्यासाठी 4 कंपन्यांनी दाखवले स्वारस्य!

Anil Ambani: अनिल अंबानींच्या कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटल लिमिटेड (RCL) च्या अधिग्रहणासाठी चार कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.

दैनिक गोमन्तक

Anil Ambani: अनिल अंबानींच्या कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटल लिमिटेड (RCL) च्या अधिग्रहणासाठी चार कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. या चार कंपन्या म्हणजे, इंडसइंड बँक, अमेरिकन मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ऑक्ट्री कॅपिटल, टोरेंट ग्रुप आणि बी-राईट ग्रुप. पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीसाठी या बोली 4,000 कोटी रुपयांच्या आहेत.

5 वेळा मुदत वाढवण्यात आली: रिलायन्स कॅपिटलसाठी बिड्स सादर करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट रोजी संपली. ही मुदत पाच वेळा वाढवण्यात आली. सुरुवातीला 54 कंपन्यांनी रिलायन्स कॅपिटलसाठी स्वारस्य दाखवले होते, परंतु आता केवळ चार कंपन्यांनी दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेचा भाग म्हणून बोली सादर केली आहे.

दोन पर्याय देण्यात आले: बोलीदारांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिल्या पर्यायामध्ये बोलीदारांना संपूर्ण RCL साठी बोली सादर करणे आवश्यक होते. तर दुसऱ्या पर्यायात ते कंपनीच्या विशिष्ट क्षेत्रासाठी बोली लावू शकतात. पिरामल ग्रुप, झुरिच रे आणि अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फंड अ‍ॅडव्हेंट यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या व्यवसायासाठी बोली लावल्याचे सूत्रांनी सांगितले.

त्याचवेळी, रिलायन्स (Reliance) निप्पॉन लाइफ इन्शुरन्ससाठी कोणतीही बोली प्राप्त झालेली नाही. याशिवाय, जिंदाल स्टील अँड पॉवर आणि यूव्ही अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने रिलायन्स कॅपिटलच्या (Reliance Capital) मालमत्ता पुनर्रचना व्यवसायासाठी बोली सादर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT