Adani Wilmar News: अदानी समूहाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. अलीकडे, मीडियामध्ये चर्चा केली जात होती की गौतम अदानी त्यांच्या स्वत: च्या एका कंपनीतील मोठा हिस्सा विकू शकतात, परंतु आज म्हणजेच गुरुवारी अदानी समूहाने याबाबत मोठी अपडेट दिली. अदानी एंटरप्रायझेसने विल्मर व्हेन्चरमधील 44 टक्के स्टेक विकल्याच्या वृत्ताचे स्पष्टपणे खंडन केले आहे. अदानी विल्मारची व्हॅल्यू $6.17 अब्ज आहे.
यापूर्वी ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा केला जात होता की, अदानी समूह अदानी विल्मारमधील हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. परंतु आज अदानी समूहाने या वृत्तांचे खंडन केले. अदानी विल्मार ही अदानी एंटरप्रायझेस आणि सिंगापूरची विल्मार इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यातील ज्वाइंट व्हेन्चर कंपनी आहे.
अदानी विल्मरचा IPO जानेवारी 2022 मध्ये आला होता, तर मार्केटमध्ये फेब्रुवारी महिन्यात लिस्टिंग झाला होता. IPO च्या वेळी या शेअर्सची किंमत 218-230 रुपयांच्या पातळीवर होती. त्याचवेळी, केवळ 3 महिन्यांनंतर शेअरने बाजारात 878 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. आज कंपनीचे शेअर्स 373.95 रुपयांच्या पातळीवर बंद झाले आहेत.
दुसरीकडे, अदानी विल्मरचा फॉर्च्यून ब्रँड देशातील निवडक FMCG ब्रँडमध्ये गणला जातो. त्याची स्पर्धा आयटीसी लिमिटेड, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड यासारख्या कंपन्यांशी आहे.
विशेष म्हणजे, अदानी विल्मर ही खाद्यतेल, तांदूळ, डाळी आणि साखरेसह इतर आवश्यक स्वयंपाकघराशी संबंधित उत्पादने देणारी FMCG कंपनी आहे. जानेवारी 1999 मध्ये अदानी ग्रुप आणि विल्मार ग्रुप यांच्यातील ज्वाइंट व्हेन्चर म्हणून याची सुरुवात झाली.
अदानी विल्मरचे सध्या भारतातील 10 राज्यांमध्ये 23 प्लांट्स आहेत. खाद्यतेल ब्रँड फॉर्च्युन हा कंपनीचा प्रमुख ब्रँड आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला 79 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.