Gautam Adani  Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group: मोठी अपडेट, 'ही' विदेशी कंपनी विकणार अदानी समूहातील हिस्सा!

Adani Share Price: अदानी समूहासाठी हे (2023) वर्ष खूपच अडचणीचे ठरले आहे.

Manish Jadhav

Adani Share Price: अदानी समूहासाठी हे (2023) वर्ष खूपच अडचणीचे ठरले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हिंडेनबर्ग रिसर्चने एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये अदानी समूहावर अनेक आरोप करण्यात आले होते.

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये लक्षणीय घट झाली. यानंतर अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. विशेष म्हणजे, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळाले.

आता पुन्हा एकदा अदानी समूहाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये एक विदेशी कंपनी अदानी समूहातील आपला हिस्सा विकत आहे.

अदानी ग्रुप

अबुधाबीच्या इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने अदानी समूहाच्या दोन कंपन्यांमधील हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. IHC हा अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या हाय-प्रोफाइल गुंतवणूकदारांपैकी एक आहे.

नियामक फाइलिंगमध्ये, IHC ने म्हटले आहे की, त्यांनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अदानी ट्रान्समिशन लि. मधील एफडीआय गुंतवणूक विकण्यासाठी एका खरेदीदाराशी करार केला आहे.

अदानी ग्रुपमध्ये इतकी गुंतवणूक केली होती

तथापि, IHC ने खरेदीदाराचे नाव उघड केलेले नाही. एप्रिल 2022 मध्ये, IHC ने अदानी ग्रीन एनर्जी आणि पॉवर कंपनी अदानी ट्रान्समिशनमध्ये प्रत्येकी $500 दशलक्ष आणि समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसमध्ये $1 बिलियनची गुंतवणूक केली होती.

त्यावेळी आयएचसीचे मुख्य कार्यकारी सय्यद बसर शुएब म्हणाले होते की, ते भारतात अदानींच्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करत आहेत.

पोर्टफोलिओ संतुलन धोरण

IHC ने म्हटले आहे की एकूण पोर्टफोलिओमध्ये पुनर्संतुलित करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून ते अदानीच्या कंपन्यांमधील आपला हिस्सा विकत आहे. मात्र, त्यांनी अदानी एंटरप्रायझेसमधील गुंतवणुकीवर काहीही सांगितले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT