8th Pay Commission Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्यांना लागणार मोठी लॉटरी; पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ?

8th Pay Commission Pension Rules: आठव्या वेतन आयोगाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Manish Jadhav

8th Pay Commission Pension Rules: आठव्या वेतन आयोगाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आतापर्यंत वेतन आयोगाचा मुख्य भर केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतन दुरुस्तीवरच असेल असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु अलिकडील घडामोडी आणि विविध अहवालांवरुन निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्येही मोठी सुधारणा पाहायला मिळू शकते असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

विशेषतः 1 जानेवारी 2026 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये काय बदल संभवतात आणि पेन्शनधारक संघटना नेमक्या काय मागण्या करत आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'भारत पेन्शनर समाज' आणि 'ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन' यांसारख्या प्रमुख संघटनांनी आठव्या वेतन आयोगाच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली. 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची पेन्शन पुन्हा नव्याने 'रीसेट' करण्यात यावी, अशी मुख्य मागणी या संघटनांनी केली.

या पार्श्वभूमीवर वेतन आयोगाची टीम विविध भागधारकांशी चर्चा करत असून 31 ऑगस्ट रोजी राजस्थान येथे, तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तमिळनाडू (चेन्नई) आणि पुद्दुचेरी येथे पेन्शनर संघटनांसोबत महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

पेन्शनर संघटनांचे ठाम मत आहे की, पेन्शन हा सरकारवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा नसून, ती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेचा पाया आहे. त्यामुळे केवळ सध्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतनच नव्हे, तर ज्येष्ठ पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबांच्या हिताचेही समान रक्षण व्हावे. नवीन फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किमान पेन्शनच्या (Pension) रक्कमेत लक्षणीय वाढ नोंदवली जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. जरी सरकारने अटींमध्ये बदलाबाबत अद्याप अंतिम औपचारिक निर्णय घेतला नसला, तरी बैठकांचे सत्र वेगाने सुरु असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT