8th Pay Commission Mumbai Meeting Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission: मुंबईतील बैठकीत 'बेसिक पे' आणि 'फिटमेंट फॅक्टर'वर महाचर्चा, वेतन आयोगासमोर युनियन्सचा मास्टरस्ट्रोक; वार्षिक पगारवाढ 6 टक्के करण्याची मागणी

8th Pay Commission Mumbai Meeting: मुंबईतील या बैठकीत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि फिटमेंट फॅक्टर यामध्ये सुधारणा करण्यावर मुख्य भर देण्यात आला.

Manish Jadhav

8th Pay Commission Mumbai Meeting: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये संपन्न होत असून शुक्रवार (23 ऑक्टोबर) हा या बैठकीचा शेवटचा दिवस आहे. याआधी आयोगाची पहिली बैठक 8 ऑक्टोबर रोजी बंगळुरु येथे पार पडली होती. मुंबईतील या बैठकीत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि फिटमेंट फॅक्टर यामध्ये सुधारणा करण्यावर मुख्य भर देण्यात आला.

वाढती महागाई आणि रोजचा खर्च लक्षात घेता देशभरातील प्रमुख कर्मचारी संघटनांनी वेतन आयोगासमोर आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मेकॅनिझमच्या वतीने किमान मूळ वेतन 69000 रुपये आणि फिटमेंट फॅक्टर 3.833 करण्याची मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे बीपीएमएसने किमान बेसिक पे 72,000 रुपये आणि फिटमेंट फॅक्टर 4 पट करण्याचा प्रस्ताव दिला. याशिवाय दोन्ही संघटनांनी वार्षिक पगारवाढ 3 टक्क्यांवरुन वाढवून 6 टक्के करण्याची आग्रही मागणी केली.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, बेसिक पे मधील वाढ ही चक्रवाढ व्याजाप्रमाणे काम करते. जर सुरुवातीचे मूळ वेतन अधिक असेल, तर दरवर्षी मिळणारी वार्षिक पगारवाढ ही खूप मोठी रक्कम बनून पगारात जमा होते. महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता थेट मूळ वेतनावर आधारित असतात, त्यामुळे बेसिक पे वाढल्यास दरमहा हातात येणारा एकूण पगार मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच ग्रॅच्युटी, लीव्ह एनकॅशमेंट आणि पेन्शन या सर्व गोष्टी निवृत्तीच्या वेळच्या शेवटच्या मूळ वेतनावर ठरत असल्याने कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मोठा आर्थिक फायदा होईल.

न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पॅनेल या वेतन आयोगाचे काम पाहत असून, प्रोफेसर पुलक घोष आणि सदस्य-सचिव पंकज जैन हे याचे अन्य सदस्य आहेत. या 8व्या वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 रोजी झाली. आयोगाचा अंतिम अहवाल स्थापनेनंतर 18 महिन्यांनी म्हणजेच मे-जून 2027च्या आसपास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी (Employees) या मागण्यांना केवळ प्रस्ताव मानणे गरजेचे आहे, कारण केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: गोव्याचा मोसमातील पहिला विजय! कर्नल नायडू करंडकात बिहारला 174 धावांनी धूळ चारली

Naman Dhir Success Story: क्रिकेट सोडून कॅनडात नोकरीचा प्लॅन, पण वडिलांच्या सल्ल्यानं पालटलं आयुष्य, 'MI'कडून मिळालेल्या संधीचं केलं सोनं; 'नमन धीर'ची संघर्ष कहाणी

Psychological Reactance Theory: मुलं सांगितलेल्या गोष्टींच्या उलटच का वागतात? पालकांनी समजून घ्यावा मानसशास्त्रातील 'हा' सिद्धांत

France Protests 2026: स्वातंत्र्य, समतेची भूमी असंतोषाने पेटली! महागाई अन् बेरोजगारीचा फ्रान्समध्ये उद्रेक; मॅक्रोन सरकार हवालदिल

Pension Rules: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकारकडून पेन्शन नियमांत मोठा बदल; नव्या SOP मुळे कागदपत्रांचा त्रास संपणार

SCROLL FOR NEXT