Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, फिटमेंट फॅक्टरवर मोठी अपडेट!

7th Pay Commission Fitment Factor Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission Fitment Factor Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी आहे. फिटमेंट फॅक्टरबाबत सरकार पुढील महिन्यात निर्णय घेऊ शकते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होईल. यासाठी एक मसुदा तयार करण्यात येणार असून, तो सरकारसोबत शेअर केला जाणार आहे. युनियनने एक मोठी अपडेट दिली आहे. यावर सरकारशी सहमती झाल्यास 52 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन फिटमेंट फॅक्टर अंतर्गत वाढवता येईल.

युनियन बदलाची मागणी करत आहे

अलीकडेच सरकारने कर्मचार्‍यांच्या (Employees) महागाई भत्त्यात वाढ केली आहे. यानंतर कर्मचाऱ्यांना जुलैपासून वाढीव महागाई भत्ता आणि महागाई (Inflation) सवलतीचा लाभ मिळणार आहे. आता यात बदल झाल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होणार आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होताच त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण पगारावर दिसून येईल. फिटमेंट फॅक्टरबाबत पुढील महिन्यापर्यंत बैठक होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी करत आहेत.

पगारात महत्त्वाची भूमिका

सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 2.57 टक्के दराने फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे, जो 3.68 पट वाढवला जाऊ शकतो. केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल म्हणजे त्याचा तुमच्या पगारावरही परिणाम होईल. वास्तविक, याच आधारे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढवले ​​जाते.

2017 मध्ये मूळ वेतन वाढवण्यात आले

फिटमेंट फॅक्टर 2.57 वरुन 3.68 वर वाढवल्यास, किमान मूळ वेतन 18 हजार वरुन 26 हजार रुपये होईल. यापूर्वी 2017 मध्ये एंट्री लेव्हल कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरकारने (Government) वाढ केली होती. मात्र त्यानंतर त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतन 18 हजार रुपये, तर कमाल वेतन 56,900 रुपये आहे.

कॅलक्युलेशन पाहा

जर सरकारने फिटमेंट फॅक्टर 3 वेळा केला, तर भत्ते वगळता कर्मचाऱ्यांचे वेतन 18,000 X 2.57 = 46,260 रुपये होईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केल्यास पगार 26000X3.68 = 95,680 रुपये होईल. 3 पट फिटमेंट फॅक्टरवर पगार 21000X3 = 63,000 रुपये असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT