7th Pay Commission   Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! या नियमात झाला मोठा बदल

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. बोनस आणि डीएच्या बातम्यांदरम्यान सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन आदेश जारी केला आहे. कार्मिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) एकाच वेळी दोन किंवा अधिक दंडाच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. हा नियम 7व्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.

शासनाने आदेश जारी केला

निवेदनानुसार, दंडाच्या पहिल्या कारवाईदरम्यान, दुसरी कारवाई देखील केली जाऊ शकते. म्हणजेच एकाच वेळी दोनदा दंड ठोठावण्याची शक्यता आहे. एका कर्मचाऱ्याला एकाच वेळी दोनदा दंड ठोठावण्यात येत आहेत. त्याचबरोबर, दोन्ही शिक्षा एकाच वेळी चालतील, असे शिक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात स्पष्टपणे लिहावे, असे विभागाने म्हटले आहे.

नियम काय आहे?

कार्मिक विभागाने सांगितले की, जर प्राधिकरणाने आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले नाही तर दोन्ही शिक्षा एकत्र लागू होतील आणि एकाच वेळी चालतील. या नियमानुसार, त्यानंतरच्या आदेशात भरघोस दंड आकारला जात असेल, तर त्याची आधीच्या आदेशापेक्षा तात्काळ अंमलबजावणी केली जाईल आणि त्याची मुदत संपल्यानंतर, आधीच्या आदेशाचा कालावधी शिल्लक राहिल्यास तोही पूर्ण केला जाईल. डीओपीटीने सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत.

पेन्शन आणि ग्रॅच्युईटी मिळणार नाही

याआधी, सरकारने CCS (पेन्शन) नियम 2021 मध्ये देखील बदल केले आहेत. या अंतर्गत, जर एखादा केंद्रीय कर्मचारी (Employees) त्याच्या सेवेदरम्यान गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळला, तर त्याची पेन्शन (Pension) किंवा ग्रॅच्युइटी किंवा दोन्ही रोखले जाऊ शकतात.

टीए नियमात दिलासा

याशिवाय, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यासंबंधीचे नियमही बदलण्यात आले आहेत. यानुसार कर्मचाऱ्यांना उत्तर-पूर्व प्रदेश, जम्मू आणि काश्मीर (Jammu And Kashmir), लडाख किंवा अंदमान आणि निकोबारच्या हवाई प्रवासासाठी CCS (Leave Travel Concession) नियम 1988 अंतर्गत सूट देण्यात आली आहे. या अंतर्गत 25 सप्टेंबर 2024 पर्यंत केंद्रीय कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT