Indian Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: नवीन वर्षापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना DA गिफ्ट, खात्यात येणार मोठी रक्कम!

7th Pay Commission DA Hike: नवीन वर्षाच्या अवघ्या काही तासांपूर्वी ओडिशा सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना बंपर भेट दिली आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission DA Hike: नवीन वर्षाच्या अवघ्या काही तासांपूर्वी ओडिशा सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना बंपर भेट दिली आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार, राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये 4 ने वाढ करण्यात आली आहे. सीएम ऑफिसच्या निवेदनानुसार डीए आणि डीआरमध्ये ही वाढ 1 जुलै 2022 पासून लागू होईल.

डीए मूळ वेतनाच्या 38 टक्के झाला

या वाढीपूर्वी राज्य सरकारकडून (Government) कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के डीए आणि डीआर देण्यात येत होता. आता वाढ केल्यानंतर ते मूळ वेतनाच्या 38 टक्के झाले आहे. राज्य सरकारने 2022 मधील डीएमध्ये केलेली ही दुसरी वाढ आहे. जुलैपासून डीएमध्ये बदल झाल्याने कर्मचाऱ्यांना एकाच वेळी सहा महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.

सप्टेंबरमध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्यात आला होता

यापूर्वी सप्टेंबरमध्ये, ओडिशा (Odisha) सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए आणि डीआरमध्ये 3 टक्के वाढ जाहीर केली होती. त्यावेळी ते 34 टक्के करण्यात आले होते. यापूर्वी मेघालय सरकारने राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. येथेही जुलै 2022 पासून महागाई भत्त्यात वाढ लागू करण्यात आली आहे.

अलीकडेच, त्रिपुरामध्येही राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए आणि डीआरमध्ये 12 टक्क्यांची बंपर वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ करण्यात आली आहे. या बदलानंतर एक लाखांहून अधिक कर्मचारी आणि सुमारे 80 हजार पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकार दरमहा 120 कोटींचा अतिरिक्त बोजा उचलणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT