Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार DA गिफ्ट, पगारात होणार बंपर वाढ!

DA Hike News: तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

DA Hike News: तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता आगामी काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट देण्याचा सरकारचा विचार आहे.

या बदलानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. यावेळीही सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढवणार असून तो 46 टक्के होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

4 टक्के महागाई भत्ता वाढीची घोषणा

सरकारने (Government) मार्च 2023 मध्ये 4 टक्के DA वाढीची घोषणा केली आहे. यानंतर महागाई भत्ता 42 टक्के झाला आहे. ही वाढ सरकारने 1 जानेवारीपासून लागू केली आहे.

आता पुढील डीए 1 जुलैपासून लागू होणार आहे. दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) चार टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या डीए 42 टक्के आहे. 1 जुलैपासून लागू होणारा डीए 46 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

यावेळी ऑगस्टमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे

दुसऱ्या सहामाहीसाठी म्हणजेच जुलै ते डिसेंबर 2023 साठी DA मधील वाढ सरकारने जाहीर केली आहे. प्रत्येक वेळी दुसऱ्या सहामाहीचा DA सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाहीर केला जातो.

मात्र यावेळी वाढीव डीए ऑगस्टमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 4 टक्के वाढ आधीच जाहीर करण्यात आली आहे.

चलनवाढीचा दर पाहता केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Employees) डीएमध्ये वाढ करण्यात आली आहे. महागाई जास्त असेल तर डीएमध्ये वाढही जास्त असेल.

पगारात किती वाढ होणार?

दुसऱ्या सहामाहीत केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 46 टक्क्यांपर्यंत वाढवला, तर पगारही त्यानुसार वाढेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याला सध्या मूळ वेतन 18,000 रुपये आहे आणि त्याला सध्या 42 टक्के दराने 7560 रुपये DA मिळतो.

जर त्याचा डीए 46 टक्के झाला तर कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 8,280 रुपये होईल. अशा प्रकारे, दरमहा 720 रुपयांची (वार्षिक 8640 रुपये) वाढ होईल. याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT