7th Pay Commission Update  Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, आता डीएनंतर वाढणार हे 4 भत्ते

DA Hike Latest News: देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission Latest News: देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर सरकार कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट देण्याचा विचार करत आहे. डीएमध्ये वाढ केल्यानंतर, सरकार एकाच वेळी आणखी 4 भत्ते वाढवण्याचा विचार करत आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.

एकत्र वाढणार 4 भत्ते!

अलीकडेच सरकारने कर्मचाऱ्यांच्या (Employees) भत्त्यात 4 टक्के वाढ केली असून, त्यानंतर या लोकांना 34 टक्क्यांऐवजी 38 टक्के डीएचा लाभ मिळणार आहे. एकाच वेळी चार भत्ते वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.

हे 4 भत्ते वाढतील

सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता, सिटी भत्ताही वाढवण्यात येणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे.

3 टक्क्यांनी वाढू शकते

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीची गणना मूळ वेतन आणि डीएच्या (DA) आधारे केली जाते. त्यामुळे या परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत असू शकते, असे मानले जात आहे.

शासनाने अधिसूचना जारी केली

28 सप्टेंबर 2022 रोजी सरकारने (Government) डीए वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अधिसूचना जारी करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. 1 जुलै 2022 पासून महागाई भत्त्याचे सुधारित दर लागू केले जातील, असे या माहितीत म्हटले आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे येतील. सरकारच्या महागाई (Inflation) भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 टक्के महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यावेळी डीए 31 टक्क्यांवरुन 34 टक्के झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT