PM Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, आज संध्याकाळी DA वर येणार मोठा निर्णय, सरकारने जारी केला आदेश!

7th Pay Commission DA Hike: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांसाठी आजची संध्याकाळ अत्यंत महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

7th pay commission DA Hike: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांसाठी आजची संध्याकाळ अत्यंत महत्त्वाची आहे.

आज संध्याकाळी, लेबर ब्युरोकडून डीए डेटा जारी केला जाईल, ज्यामुळे तुम्हाला कळेल की येत्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आहे.

विभागाकडून 28 एप्रिलच्या संध्याकाळी डेटा जारी केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यातही सरकार डीए वाढीच्या अपडेटमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करु शकते, त्यानंतर कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळू शकतो.

1 जुलैपासून महागाई भत्ता वाढणार आहे

सरकार 1 जुलै 2023 रोजी महागाई भत्ता लागू करेल, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा (Employees) DA वाढेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 42 टक्के दराने डीए मिळत आहे.

मार्च महिन्याचा आकडा येईल

महागाई भत्त्यात सुधारणा 6 महिन्यांच्या CPI-IW निर्देशांकाच्या आधारे केली जाते. डेटा AICPI-IW ने जारी केला आहे. निर्देशांकाच्या आधारे आतापर्यंत महागाई भत्ता 43.79 वर पोहोचला आहे. तर मार्च महिन्याचे आकडे 28 एप्रिल रोजी संध्याकाळी जारी केले जातील.

46 टक्के महागाई भत्ता मिळू शकतो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे मानले जात आहे की सरकार जुलैमध्येही महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करु शकते. तज्ज्ञांच्या मते, सरकारने (Government) 4 टक्के दर वाढवल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने डीएचा लाभ मिळेल. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.

फेब्रुवारीतील आकडा काय होता

फेब्रुवारीमध्ये निर्देशांकाचा आकडा 132.8 वरुन 132.7 वर आला होता. येत्या काही महिन्यांत निर्देशांक बदलला नाही आणि 132.7 वर राहिला तरी महागाई भत्त्यात किमान 3 टक्क्यांची वाढ होईल.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला डेटा जारी केला जातो

AICPI-IW डेटा कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रसिद्ध केला जातो. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी डेटा जारी केला जातो. यामध्ये विविध औद्योगिक क्षेत्रातील अनेक वस्तूंचा डेटा कलेक्ट केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT