Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: महागाईच्या सवलतीबाबत केंद्र सरकारचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

7th Pay Commission Update: सरकारने पेन्शनधारकांच्या महागाई रिलीफ (DR) संदर्भात एक निवेदन जारी केले आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission DR Hike: केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने पेन्शनधारकांच्या महागाई रिलीफ (DR) संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. कार्मिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या निवृत्तीवेतनधारक आणि कल्याण विभागाने म्हटले की, पेन्शनधारकांना महागाई भत्ता जुन्या आणि मूळ पेन्शनच्या आधारावर दिला जाईल. त्यासाठी संबंधित विभागाने अधिकृत अधिसूचनाही जारी केली आहे.

शासनाने निवेदन दिले

पेशनर्स अ‍ॅन्ड वेलफेयर डिपार्टमेंटने म्हटले की, आम्हाला यासंबंधी अनेक प्रश्न प्राप्त झाले होते, ज्यामध्ये विचारण्यात आले होते की, मूळ निवृत्तीवेतनावर महागाई भत्ता दिला जात आहे की, पेन्शनवरील कम्युटेशननंतर तो कमी केला जातो? याबाबत माहिती देताना विभागाने सांगितले की, आयोगाच्या शिफारशींच्या आधारे कम्युटेशनपूर्वीच्या मूळ पेन्शनवर (Pension) महागाई सवलत देण्यात येते. कम्युटेड पेन्शन कपात केल्यानंतर, पेन्शनवर महागाई सवलत दिली जात नाही.

पेन्शनधारकांना महागाईत दिलासा मिळाला

पेन्शन नियम 2021 च्या उप-नियम 52 नुसार, वाढत्या महागाईमध्ये (Inflation) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सवलत दिली जाते. ही रक्कम पेन्शनधारक किंवा त्याच्या लाभार्थीला दिली जाते. महागाई भत्त्याप्रमाणे, सरकार दर सहा वर्षांनी त्यात वाढ करण्याची घोषणा करते. कर्मचार्‍यांचा डीए वाढवताना, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी डीआर वाढवण्याची घोषणा केली जाते.

यावेळी DR किती आहे?

केंद्र सरकारने (Central Government) यावेळी 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 38 टक्के वाढ केली आहे. यासोबतच पेन्शनधारकांना मिळणारा महागाई सवलतही 38 टक्के करण्यात आला आहे. निवृत्तीवेतनधारकांसाठी ही महागाई सवलत कम्युटेशनपूर्वी मूळ पेन्शनच्या आधारे मोजली जाईल. 1 जुलै 2022 पासून 38 टक्के महागाई सवलत लागू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT