7th Pay Commission DA Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, DA पुन्हा एकदा वाढणार!

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ करणार आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ करणार आहे.

जानेवारी ते जून या कालावधीतील महागाई भत्ता जुलैमध्ये वाढेल, मात्र तो किती वाढेल याचे आकडे आताच यायला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यात 0.5 प्वाइंटची वाढ झाली आहे, याचा अर्थ भविष्यात महागाई भत्त्यातही वाढ होणार आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारातही वाढ होणार आहे.

24 मार्चला मंजुरी मिळाली

अलीकडेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. या वाढीला 24 मार्च रोजी शासनाने मान्यता दिली असून त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे.

त्याचवेळी, याआधी कर्मचाऱ्यांना 48 टक्के दराने डीए मिळत होता. सध्या जानेवारी 2023 च्या AICPI निर्देशांकाचे आकडे यायला सुरुवात झाली आहे.

जुलै महिन्यात वाढ होणार आहे

1 जानेवारी 2023 पासून कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळत असून आता जुलै महिन्यात त्यात वाढ होणार आहे.

जानेवारी 2023 साठी CPI-IW निर्देशांक 132.8 वर पोहोचला आहे. या आधारे महागाई भत्ता वाढवला जातो. जुलैमध्ये येणाऱ्या आकड्यांमध्ये 1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

म्हणजेच तो 43 टक्क्यांवर पोहोचला आहे. फेब्रुवारी, मार्च आणि इतर महिन्यांची आकडेवारी आल्यानंतर त्यात किती वाढ होणार हे ठरेल.

3 दिवसांनंतर डेटा जारी केला जाईल

नवी आकडेवारी 31 मार्च म्हणजेच 3 दिवसांनी येणार आहे. या आकडेवारीत फेब्रुवारी महिन्यात निर्देशांक कसा आहे हे कळेल. कामगार मंत्रालयाकडून डेटा जारी केला जाईल. या आकड्यांच्या आधारे पुढील गणना केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT