30 to 40 percent increase in salaries of employees in cyber security companies
30 to 40 percent increase in salaries of employees in cyber security companies 
अर्थविश्व

या सायबर सिक्युरिटी कंपनीतील कर्मचार्‍यांच्या पगारात 30 ते 40% वाढ

गोमंन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली: सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या पॅनासिया इन्फोसेकने(Panacea Infosec) एप्रिलपासून सर्व कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये(salaries employees) 30 ते 40 टक्क्यांनी वाढ केली आहे. पॅनासिया इन्फोसेकने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीत सध्या 230 कर्मचारी कामावर असून या कर्मचार्‍यांची संख्या 25 वरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे. पॅनेसिया इन्फोसेक 245 टक्के विकास दरासह देशातील वेगाने वाढणारी सायबर सुरक्षा ऑडिट कंपन्यांपैकी एक आहे.(30 to 40 percent increase in salaries of employees in cyber security companies)

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनी आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये सरासरी 30-40% वाढ देणार आहे. कोविड-19 च्या संकटकाळात माहिती तंत्रज्ञान आणि इतर डिजिटल सेवांवर अवलंबून राहणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे सायबर सुरक्षा आणि गोपनीयता सेवांची मागणी वाढली आहे, असे पॅनासिया इन्फोसेकने म्हटले आहे.

Vi च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी                                                              

ही कंपनी 2012 मध्ये सुरू करण्यात आली होती
पॅनेसिया इन्फोसेकची सुरुवात 2012 साली नवी दिल्ली येथून झाली. सध्या या कंपनीकडे 45 देशांमधील 400 ग्राहक आहेत. नवीन व्यवसाय आणि ऑनलाईन व्हर्च्युअल असताना कंपन्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा आणि ऑडिट सेवा हे मुख्य तंत्रज्ञान बनले आहे. पॅनेसिया इन्फोसेकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की," गेल्या वर्षी कोरोना च्या कठीण काळात जोरदारपणे संस्थेचे काम चालवल्याबद्दल आणि नवीन मानसिकतेचे प्रदर्शन केल्याबद्दल कंपनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांचे आभारी मानते आहे,"

कोरोना संकट असूनही आयटी क्षेत्रात पगारवाढ
देशाते कोरोनाचे संकट असूनही आयटी क्षेत्रात (IT Sector) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढत आहे. देशातील बड्या आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांचे पगार वाढवले ​​आहेत. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने 6 महिन्यांच्या कालावधीत कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये दोनदा वाढ केली आहे. या कंपनिने एप्रिल 2021 पासून आपल्या सर्व कर्मचार्‍यांना सुधारित वेतन देणे सुरू केले आहे. त्याचबरोबर देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने(Infosys) जानेवारी 2021 पासून आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने आपल्या बर्‍याच कर्मचार्‍यांची इंक्रिमेंट थांबवली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

Theft In Bodgeshwar Temple: बोडगेश्वर मंदिरात पुन्हा मोठी चोरी; फंडपेटी फोडून 12 लाखांची रोकड लंपास

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

SCROLL FOR NEXT