Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: पीएम किसानच्या हप्तापूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, सरकारने सुरु केली नवी योजना!

PM Kisan: केंद्राच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारीमध्ये आला आहे. आता देशभरातील शेतकरी 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Manish Jadhav

Natural Farming: केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. केंद्राच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारीमध्ये आला आहे. आता देशभरातील शेतकरी 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

मात्र याआधी, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात नैसर्गिक शेती करणाऱ्या सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांना प्राकृत खेती खुशाल किसान योजना (PK3Y) अंतर्गत प्रमाणित केले जाईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

28 टक्के शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाशिवाय नैसर्गिक शेती केली

कृषी सचिव राकेश कंवर म्हणाले की, एका अभ्यासानुसार, 28 टक्के शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय एकमेकांकडून शिकून नैसर्गिक शेतीचे तंत्र स्वबळावर विकसीत केले. त्यामुळे या आर्थिक वर्षात 'प्राकृतिक खेती खुशाल किसान योजने'चा मुख्य भर नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र करण्यावर असेल.

कंवर म्हणाले की, शेतकऱ्यांना (Farmers) एकत्र आणणे, नैसर्गिक शेतीखाली त्यांचे क्षेत्र वाढवणे, कार्यशाळा आयोजित करणे आणि क्षमता वाढीचे प्रशिक्षण यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, जमिनीच्या पातळीवरील निकालांना मिळालेला प्रतिसाद आणि यश हे दर्शविते की, नैसर्गिक शेतीचे तंत्र फायदेशीर असल्याची सर्वांना खात्री पटली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT