Cyber Fraud  Dainik Gomantak
अर्थविश्व

Cyber Fraud: जानेवारी ते मार्चदरम्यान चारपैकी एक व्यक्ती ठरला हॅकिंगचा बळी; जाणून घ्या सर्वात धोकादायक मालवेअर?

Cyber Fraud: आजच्या काळात स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.

Manish Jadhav

Cyber Fraud: आजच्या काळात स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्याच्या मदतीने लोक इंटरनेटचा वापर करुन घरी बसून ऑनलाइन तिकीट बुक करु शकतात, ऑनलाइन बिल पेमेंट करु शकतात, देशातील आणि जगातील कोणत्याही विषयाची माहिती मिळवू शकतात, त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी गप्पा मारु शकतात, ऑडिओ ऐकू शकतात-व्हिडिओ कॉल करु शकतात, शेअरिंग करु शकतात. परंतु काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी त्याचा दुरुपयोग करु लागले आहेत.

चारपैकी एक जण हॅकिंगचा बळी ठरला

दरम्यान, हॅकिंगच्या घटना मागील काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत (जानेवारी-मार्च) दर चारपैकी एका व्यक्तीला हॅकिंगचा सामना करावा लागला आहे. एका रिपोर्टनुसार, मालवेअर अजूनही एक मोठा सायबर धोका आहे.

रिपोर्टमध्ये काय उघड झाले?

जागतिक सुरक्षा कंपनी कॅस्परस्कीच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, या काळात भारतातील 22.9% इंटरनेट वापरकर्त्यांना वेबवरुन येणाऱ्या धोक्यांना सामोरे जावे लागले. त्याचवेळी, सुमारे 20.1% वापरकर्ते त्यांच्या संगणकांमध्ये उपस्थित असलेल्या धोक्यांमुळे त्रासले होते.

हा मालवेअर सर्वात धोकादायक ठरला

कंपनीचे म्हणणे आहे की, विशेषतः मालवेअर हा अजूनही लोक आणि कंपन्यांसाठी मोठा धोका आहे. हॅकर्स इंटरनेट ब्राउझर आणि त्यांच्या ॲड-ऑनमधील असुरक्षिततेचा फायदा घेत आहेत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की "फाइल-लेस मालवेअर" या तिमाहीत सर्वात धोकादायक असल्याचे सिद्ध झाला आहे, कारण तो हल्ल्याचा कोणताही पुरावा सोडत नाही.

दरम्यान, भारतीय वापरकर्त्यांची फसवणूक करण्यासाठी फिशिंग, बेटिंग आणि प्रीटेक्सटिंग यासारख्या सोशल इंजीनियरिंग पद्धती देखील वापरल्या जात आहेत. कॅस्परस्कीच्या मते, त्यांच्या वेब सुरक्षेने जानेवारी-मार्च दरम्यान 12.4 दशलक्षाहून अधिक इंटरनेटद्वारे येणाऱ्या धोक्यांना रोखले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT