Seraulim Gramsabha: सुरावली ग्रामसभेत विविध मुद्यांवर चर्चा
Seraulim Panchayat Gramsabha
सासष्टी: सुरावली पंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या जमीनीचा भराव व जमीनीचे रुपांतर यावरून ग्रामसभेत आज स्थानिकांनी सरपंच व उपसरपंचांना धारेवर धरले. त्यानंतर आजची ग्रामसभा तहकुब केल्याचे सरपंच सीमा शंके यांनी सांगितले.
सध्या जमीन रुपांतरण कायद्याच्या १७ (२) व ३९(ए) या कलमाखाली या परिसरात जमीन रुपांतर चालू आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याच प्रमाणे जमीन भरावाचे कामही सुरु आहे. पश्र्चिम बगल रस्त्यामुळे पाणी साचले आहे व शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. ही कामे त्वरीत बंद करावी, अशी मागणी स्थानिकांनी ग्रामसभेत केली.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पंचायतीने व्यापारी परवाना दिला पण त्यात कसला व्यवसाय हे नमूद करण्यात आलेले नाही. ज्या जागेवर व्यापारी परवाना दिला आहे ती जागा उपसरपंचांच्या वडिलांच्या नावे आहे, असे सांगण्यात आले. यासंदर्भात, स्थानिकांनी पोलिस तक्रार सुद्धा दाखल केली आहे. उपसरपंच लेझली दोरादो यांनी सांगितले की काही लोक आपल्यावर निराधार व वैयक्तिक आरोप करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.