Tsunami Mock exercise: जागतिक त्सुनामी दिनानिमित्त मॉक ड्रिल
Tsunami Mock exercise Goa Morjim
आगोंद : जागतिक त्सुनामी दिनानिमित्त समुद्र किनाऱ्यावर त्सुनामीसंदर्भात मॉक ड्रिल राबवण्यात आले. सुरवातीला स्थानिकांसह अन्य नागरिकांची काय चालले याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली. मॉक ड्रिलच्या थरार नाट्याचा नागरिकांनी अनुभव घेतला.
या मॉक ड्रीलमध्ये अग्निशमन दलाचे जवान, काणकोण पोलिस, दृष्टीचे जवान, स्थानिक मच्छीमार, वाहतूक पोलिस, आरोग्य खात्याचे कर्मचारी व रुग्णवाहिकांना सहभागी करून घेण्यात आले होते.
यावेळी काणकोण उपजिल्हाधिकारी तथा आपत्कालीन व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधू नार्वेकर, मडगावचे उपजिल्हाधिकारी व्हिलसन केलीस, मामलेदार मनोज कोरगावकर, जितेंद्र बुगडे, गायत्री नाईक देसाई, शस्त्र दलाचे वीरेंद्र सिंग, अग्निशमन दलाचे धीरज देसाई, वाहतूक पोलिस निरीक्षक गौतम साळुंखे, किनारी पोलिस निरिक्षक हरीश राऊत देसाई, नवलेश देसाई, नगरसेवक सायमन रिबेलो, लक्ष्मण पागी, भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, सरचिटणीस दिवाकर पागी व अन्य नागरिक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.