Leopard Attack at Virnoda: बिबट्याने पाडला गायीचा फडशा! विर्नोडा-पेडणे परिसरात घबराट; वनखात्याकडे बंदोबस्ताची मागणी
Virnoda Pernem Leopard Attack On Cow
पेडणे: भूतवाडी, विर्नोडा-पेडणे येथील प्रमिला राव यांच्या मालकीची दुभती गाय रानात चरायला गेली असता बिबट्या तिचा फडशा पाडला. राव कुटुंबाने गाईला मंगळवारी १५ रोजी चरण्यासाठी रानात सोडले होते. मात्र दोन दिवस ती गोठ्यात न परतल्याने रानात शोध घेतला असता आज सकाळी ती मृतावस्थेत सापडली. या गाईवर बिबट्याने हल्ला करून तिचे ठिकठिकाणी लचके तोडले.
दरम्यान, या प्रकारामुळे पेडणे परिसरात घबराट पसरली असून, वन खात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.