Capt. Viriato Fernandes: गोव्यातील कायदा आणि गुन्हेगारीबाबत विरियातो यांची सरकारवर सडकून टीका

Capt. Viriato Fernandes Criticize The Government: राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असल्याचे म्हणत दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सावंत सरकारवर सडकून टीका केली.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असल्याचे म्हणत दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सावंत सरकारवर सडकून टीका केली. सरकारचे कुणावरही नियंत्रण राहिलेले नाही. एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या नावाने गोव्याची बदनामी होत आहे. एस्कॉर्ट सर्व्हिस म्हणजे वेश्याव्यवसाय असा त्याचा अर्थ झाल्याचे सांगून गोवा हे वेश्याव्यवसाय, अमली पदार्थ, बेरोजगारीचे केंद्र बनल्याचे म्हणत फर्नांडिस यांनी टीकास्त्र डागले. जर सरकारने सध्या गोव्यात जी बेकायदेशीर कृत्ये चालू आहेत, त्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांना स्वातंत्र्य दिले व पोलिसांनी गैरव्यवहारात गुंतलेल्यांवर कडक कारवाई केली तरच गोवा यातून बाहेर निघू शकेल, असेही कॅप्टन म्हणाले. गोव्यात चांगल्या पर्यटकांची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com