Watch Video: कादर खान यांचा डुप्लिकेट, तुमचा विश्वास नाही बसणार; पाहा व्हिडिओ

आजकाल शाहरुख खानपासून ते आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्यासारखे दिसणारे लोक सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत.
Viral Video
Viral Video Dainik Gomantak

अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री यांचे डुप्लिकेट सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असतात. आजकाल शाहरुख खानपासून ते आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्यासारखे दिसणारे लोक सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत. दरम्यान, बॉलीवूडचे दिग्गज दिवंगत अभिनेते कादर खान (Kadar Khan) यांच्यासारखा दिसणारा एक डुप्लिकेट व्यक्ती सोशल मिडियातून समोर आला आहे, ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत.

Viral Video
S.S Rajamauli :"हा काही बॉलिवूडचा चित्रपट नाही, साऊथचा आहे"! का संतापले दिग्दर्शक राजामौली?

ज्युनियर कादर खान नावाच्या प्रोफाइलवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्यक्तीचा चेहरा बऱ्याच अंशी कादर खान यांच्यासारखाच दिसतो. हा व्यक्ती देखील कादर खान यांच्यासारखे एक्सप्रेशन देताना दिसत आहे. या कलाकाराच्या चेहऱ्याचे टेक्सचरसह डोळे, केस आणि स्टाइलही कादर खान यांच्याशी मिळतीजुळती आहे. कादर खान यांच्या डुप्लिकेटचे नाव विकी चड्ढा असे आहे.

Viral Video
Pathan Controversy: पठाणवर बहिष्कार टाकणाऱ्यांना शाहरुखच्या चाहत्यांचं चोख उत्तर 50 हजार चाहते सज्ज..

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, तुम्हाला पाहून मला कादर खान यांची आठवण येते. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, कादर खान हे फिल्मी दुनियेचे बादशाह होते आणि त्यांच्यानंतर तुम्हाला हे कौशल्य दाखवण्याची संधी देवाने दिली आहे. तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, तुम्ही खरोखर कादर खानसारखे दिसता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com