S.S Rajamauli :"हा काही बॉलिवूडचा चित्रपट नाही, साऊथचा आहे"! का संतापले दिग्दर्शक राजामौली?

RRR च्या ला नाटु नाटु गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाल्यानंतर झालेल्या टीकेवरुन राजामौली संतापले आहेत
S.S Rajamauli on Natu Natu's Success
S.S Rajamauli on Natu Natu's Success Dainik Gomantak

RRR Director SS Rajamauli on 'Natu Natu' ..2022 साल ज्या मोजक्या चित्रपटांनी गाजवले त्यात केजीएफ, RRR या चित्रपटांचं नाव घ्यावं लागेल. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी चांगलाच धुमाकुळ घातला होता. यातल्या RRR या SS राजामौली यांच्या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. आता 'RRR' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या चित्रपटातल्या 'नाटू-नाटू' या हिट गाण्याने 80 व्या गोल्डन ग्लोबमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा (मोशन पिक्चर) पुरस्कार जिंकला.RRR स्टार्स राम चरण आणि ज्युनियर NTR यांच्या या गाण्याने टायलर स्विफ्ट, रिहाना आणि लेडी गागा या सगळ्यांना मागे टाकत गोल्डन ग्लोबमध्ये सोहळ्यात आपली छाप सोडली आहे.

RRR चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याला 80 व्या गोल्डन ग्लोबमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला ही गोष्ट काही लोकांना रुचली नाही. या गोष्टीवरून बराच गोंधळ झाला. पुरस्कार मिळण्याएवढं हे गाणं नक्कीच चांगलं नाही, अशी प्रतिक्रीया आली. यावर आता चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली चांगलेच संतापले आहेत.

 चित्रपटातील नातू नातू या गाण्याला हा पुरस्कार देण्यात आल्यापासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे . काही लोक या गाण्याला खूप साधं म्हणत आहेत, त्यांच्या मते याला एवढा मोठा सन्मान मिळायला नको होता. 

S.S Rajamauli on Natu Natu's Success
Pathan Controversy: पठाणवर बहिष्कार टाकणाऱ्यांना शाहरुखच्या चाहत्यांचं चोख उत्तर 50 हजार चाहते सज्ज..

'डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका'सोबत नुकत्याच झालेल्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनात राजामौली बोलत होते. राजामौली म्हणाले, "RRR हा बॉलीवूड चित्रपट नाही, हा दक्षिण भारतातील एक तेलुगू चित्रपट आहे जिथून मी आलो आहे"

नाटू-नाटू हे गाणं संगीतकार एमएम करियावानी यांचं आहे आणि काल भैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. गाण्याला प्रेक्षकांकडुनही भरपूर प्रतिसाद मिळाला पण नकारात्मक प्रतिक्रीयांमुळे संतापलेल्या राजामौली यांनी बॉलिवूडवरही निशाणा साधला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com