भली मोठी टोपी घालून कुठं फिरतीये मौनी? पाहा अदाकारीची खास झलक

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मौनी रॉय होळीची सुट्टी साजरी करण्यासाठी मोरोक्को, श्रीलंका येथे गेली आहे.
Mouni Roy
Mouni RoyInsta/ mouniroy
Published on
Updated on

टेलिव्हिजन जगातील 'नागिन' फेम अभिनेत्री आणि बॉलिवूडची सुंदर स्टार मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या लग्नानंतर पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अवतारात परतली आहे. सध्या ती होळीची सुट्टी साजरी करण्यासाठी मोरोक्को, श्रीलंका येथे गेली आहे. इथूनच मौनी तिच्या चाहत्यांसोबत सतत फोटो शेअर करत असते. यातील काही फोटो इतकी सुंदर आहेत की चाहते तीचे फोटो स्टेटसलाही ठेवत आहेत.

मौनी रॉयने आज म्हणजेच शनिवारी असा एक फोटो शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांसाठी एक विकेंड सरप्राइज होते. या फोटोमध्ये मौनी मोठी टोपी घालून नॉटेड बिकिनीमध्ये पोज देत आहे. या फोटोतील मौनीचे हॉट फिगर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लग्नानंतर मौनी आणखीनच सुंदर दिसत आहे अशी कमेंट युजर्स मौनीच्या फोटोवर करत आहे.

शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी

मौनी रॉयने होळीच्या दिवशी हटके लूक केला होता. ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती क्रीम कलरच्या नेट शॉर्टमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. याशिवाय मौनीने तिच्या हॉटेलच्या रूममधला एक फोटो, पिझ्झाचा फोटो, ड्रिंकचा फोटो आणि बाकीचे तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. 27 जानेवारीला मौनी रॉयने सूरज नौबियारशी लग्न केले. तो एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. सूरज मूळचा भारतीय आहे. काही काळापूर्वी मौनी आणि सूरज यांची भेट झाली होती, त्यानंतर त्यांच्यातील मैत्री वाढली. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Mouni Roy
'देसी गर्ल'ने विदेशात पती निक सोबत केली रंगांची उधळण

मौनीची कारकीर्द

अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनय कारकिर्दीला टेलिव्हिजन जगापासून सुरुवात केली. टीव्हीवर अनेक यशस्वी भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री मौनी रॉय आता बॉलिवूडमध्येही आपले पाय रोवत आहे. अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिसली होती, ज्यामध्ये तिने खिलाडी कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती. आता मौनी रॉय लवकरच रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये मौनी रॉय खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com