Watch Video: साऊथ सुपरस्टारच्या लेकीने मराठीतून दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

सध्या महेश बाबूच्या मुलीने दिलेल्या संक्रातीच्या मराठीमध्ये दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Watch Video
Watch VideoDainik Gomantak

संपूर्ण देशात 15 जानेवारी रोजी मकर संक्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त्याने मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक लोक सकाळी गंगेत स्नान करतात, तर काही लोक दानधर्म करतात.

या दिवशी काळे कपडे घालण्याला खुप महत्त्व आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेकजण एकमेकांना मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) शुभेच्छा देताना दिसतात.

दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या (Mahesh Babu) मुलीने चक्क मराठीमध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देउन शुभेच्छा दिल्या जातात. या सणाचा (Festival) आनंद साजरा करण्याची परंपरा आहे.

तिळगुळ देताना 'तिळगुळ द्या गोड गोड बोला' असे बोलले जाते. आता महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची मुलगी सिताराचा एक व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सितारा चक्क मराठीमध्ये 'संक्रातीच्या शुभेच्छा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला' असे बोलताना दिसत आहे.

नम्रता शिरोडकरने इन्स्टाग्रामवर मुलगी सिताराचा संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिताराने लालसर रंगाचा सुंदर असा पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये सितार अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या व्हिडीओने तर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नम्रताने हा व्हिडीओ शेअर करत 'मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा' असे कॅप्शन दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com