Bhavatharini Passes Away: प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांच्या मुलीचे श्रीलंकेत निधन!

Bhavatharini Passes Away: 26 जानेवारी रोजी त्यांचे पार्थिव चेन्नईला आणले जाण्याची शक्यता आहे, तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
Bhavatharini Passes Away
Bhavatharini Passes AwayDainik Gomantak
Published on
Updated on

Bhavatharini Passes Away: प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांची मुलगी भवथारिनी यांचे गुरुवारी वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत उपचारादरम्यान त्यांचा यकृताच्या कर्करोगाने मृत्यू झाला.

आपल्या मधूर आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या भवतारिणी या आजाराशी झुंज देत होत्या. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठऱली आणि गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता श्रीलंकेत त्यांचे निधन झाले. 26 जानेवारी रोजी त्यांचे पार्थिव चेन्नईला आणले जाण्याची शक्यता आहे, तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

इलैयाराजाचा मित्र आणि अभिनेता भारतीराजाने ट्विटरवर लिहिले की, 'मी माझ्या प्रिय मित्राचे सांत्वन कसे करू, हे मला समजत नाही. भवतारिणी यांचे निधन हे आमच्या कुटुंबाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. चिन्मयी श्रीपादाने यांनी म्हटले आहे की, 'भवतारिणी इलायराजा माझ्या ओळखीच्या सर्वात छान लोकांपैकी एक होती. सुंदर मुलगी होती. मी राजा सर, कार्तिक राजा आणि युवन शंकर राजा यांना या दु:खातून लवकर बाहेर पडण्याची शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करतो. अतिशय दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'रासय्या' मधून गायनात पदार्पण केल्यानंतर, भवतारिणीने अनेक तमिळ चित्रपटांना आपला मधुर आवाज दिला. त्यांनी त्यांचे वडील इलैयाराजा, तसेच त्यांचे भाऊ, कार्तिक राजा आणि युवान शंकर राजा यांच्यासारख्या संगीतकारांसाठीसुद्धा गाणी गायली आहेत. देवा आणि सिरपी यांच्या रचनांनाही त्यांनी आपला आवाज दिला. त्यांना त्यांच्या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com