Archana Puran Singh : 'कॉमेडी'चा शिक्का अर्चना पुरन सिंह यांनी या चित्रपटाने पुसला..

विनोदी असा शिक्का बसलेल्या अर्चना पूरण सिंह यांच्यातली प्रतिभा बघायची असेल तर हा चित्रपट जरुर बघा.
Archana Puran singh
Archana Puran singhDainik Gomantak

अर्चना पूरण सिंह यांना लोकांनी केवळ विनोदी भूमीकांमधुनच पाहिले आहे. 90च्या दशकात आलेले त्यांचे सगळे चित्रपटात त्या विनोदी भूमीकेतच दिसल्या आहेत. आपल्या विनोदी भूमीकेने अर्चना पूरण सिंह यांनी प्रेक्षकांना नक्कीच हसवले होते पण त्यांच्यावर विनोदी अभिनेत्री म्हणुन जो शिक्का बसला तो कायमचा.

पण आता चित्रपटाने त्यांच्यावर लागलेला शिक्का पुसून टाकला आहे. वर्षानुवर्षे लोकांना हसवणाऱ्या अर्चना पूरण सिंह यांनी पुन्हा एकदा आपल्या गंभीर अभिनयाने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. अर्चना पूरण सिंगने यावेळी कमाल अभिनेता कुमुद मिश्रासोबत एका चित्रपटात काम केले आहे.

सत्यकथेवर आधारित हा चित्रपट त्या घोटाळ्यावर आधारित आहे ज्यात विमाधारकांचे खोटे मृत्यू दाखवून सुमारे दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. कलात्मकतेची किनार लाभलेला हा चित्रपट खऱ्या अर्थाने अर्चना पूरण सिंह यांच्या अभिनयाने नटला आहे.

हरियाणा आणि त्याच्या शेजारच्या राज्यांमध्ये 200 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे, ज्यामध्ये विमाधारकांच्या पॉलिसी दाव्यांची बनावट पेमेंट करण्यात आली होती. या लघुपटात गंभीर आजारांनी ग्रासलेल्या लोकांच्या नावावर झालेल्या या घोटाळ्याच अपघात विमा रॅकेटशी संबंध आहे. याच विषयावर निर्माते-दिग्दर्शक महेश नायर यांनी 'हम दोहो' हा चित्रपट बनवला आहे.

, नायर म्हणतात, 'हा विषय निवडण्यामागे माझ्याकडे वैयक्तिक कारण आहे. जसजसे माझे आईवडीलांचं वय वाढत गेले, तसतसे मला जाणवले की वैद्यकीय समस्या आणि एकमेकांची साथ हाच विचार त्यांच्या मनात होते. आपल्यापैकी बहुतेकजण आता विभक्त कुटूंबात राहतात आणि आपल्या पालकांपासून खूप दूर राहतात. वृद्ध जोडपे एकाकीपणाचा कसा सामना करतात आणि एक जोडीदार दुसऱ्यासाठी काय करू शकतो यावर हा चित्रपट आधारित आहे.

Archana Puran singh
Rakhi Sawant-Adil Khan : "आम्ही दोघं सध्या"... राखी सावंतसोबतच्या लग्नावर आदिल खान दुर्राणी म्हणाले...

महेश नायरला त्याच्या शॉर्ट फिल्मसाठी दोन गोष्टींची खात्री होती. पहिली गोष्ट म्हणजे कथा मनोरंजक असावी आणि त्यात ट्विस्ट असावा. दुसरे म्हणजे, कथा कलाकारांना आवडेल अशी असावी. नायर यांच्या म्हणण्यानुसार, "मी हे दोन्ही मुद्दे निवडले आणि अशा प्रकारे 'हम दो'ची कथा जन्माला आली. 

पुढे नायर म्हणतात मी देव आनंदच्या जुन्या 'हम दूं' चित्रपटाचा चाहता आहे.तेच शीर्षक मी या चित्रपटाला दिले".'हम दोनों'ची संपूर्ण कथा सरोज या 50 वर्षीय महिलेच्या दृष्टीकोनातून दाखवण्यात आली आहे. जो हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहे. 

महेश नायर म्हणतात, 'मला हे लोकांच्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे सांगायचे होते. लोक अर्चना पूरण सिंगला द कपिल शर्मा शोमधील तिच्या हसण्यामुळे ओळखतात. खूप दिवसांपासून त्याचा अभिनय कोणी पाहिला नाही, म्हणून मी त्यांच्या या विनोदी प्रतिमेच्या विरोधात या भूमिकेत कास्ट केले.

 त्यांनाही भूमिका आवडली आणि त्यांचा लगेचच ती करायला होकार आला. या चित्रपटात त्यांनी दमदार अभिनय केला आहे. साहजिकच त्यांच्यातली प्रतिभा दिसु शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com