PK Rosy: दलित समाजाच्या त्या अभिनेत्रीने उच्चवर्णिय मुलीची भूमीका साकारली आणि लोकांनी तिचे घर जाळले...

एकेकाळी देशात जातीव्यवस्था इतकी होती की एका अभिनेत्रीला आपलं घर गमवावं लागलं होतं
PK Rosy
PK RosyDainik Gomantak

PK Rosy: अलिकडे शाहरुख खानच्या पठानची जेवढी चर्चा झाली तेवढी इतर कुठल्याही चित्रपटाची झाली नसेल, एवढी चर्चा या चित्रपटाची झाली. वादग्रस्त चित्रपट आपल्या देशाला नवीन नाहीत.

पण हे अलीकडेच सुरू झालं असं नाही, पूर्वीही चित्रपटातल्या कुठल्याही दृश्यावरून वाद निर्माण होण्याची परंपरा होतीच, आपल्या देशात जातीव्यवस्थेने भरडली गेलेली कित्येक माणसं आहेत, ही गोष्ट आहे अशाच एका अभिनेत्रीची.

ती स्वतः दलित समाजातून आली होती आणि या चित्रपटात तिने एका उच्चवर्णीय महिलेची भूमिका केली होती, ज्यामुळे तिला खूप विरोध सहन करावा लागला होता. चित्रपटात एक दृश्य होते ज्यात पुरुष नायक तिच्या केसातील फुलाचे चुंबन घेतो. या दृश्यावर लोक संतापले आणि तिचे घरही जाळले.

गुगलने शुक्रवारी मल्याळम सिनेमातील पहिली महिला अभिनेत्री आणि पहिली दलित अभिनेत्री पीके रोझी यांना तिच्या १२०व्या जयंतीनिमित्त डूडल समर्पित केले. हे गुलाबाची फुले आणि फिल्मी रिल्सने सजवण्यात आले आहे.

चित्रपटात मुख्य भूमिका करणारी पीके रोझी ही पहिली अभिनेत्री होती. ९०३ मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जन्मलेल्या रोझीला लहान वयातच अभिनयाची आवड निर्माण झाली.

1928 मध्ये विगथाकुमारन (द लॉस्ट चाइल्ड) या चित्रपटात मुख्..भूमिका साकारल्यानंतर ती प्रसिद्ध झाली. ती स्वतः दलित समाजातून आली होती आणि या चित्रपटात तिने एका उच्चवर्णीय महिलेची भूमिका केली होती, ज्यामुळे तिला खूप विरोध सहन करावा लागला होता.

रोजी सारखी एखादी तथाकथित खालच्या समाजातली स्त्री उच्चवर्णीय व्यक्तीची भूमीका साकारते हे त्या काळच्या रुढीप्रिय समाजाला सहन झाले नाही आणि लोकांनी तिचं घर जाळलं

PK Rosy
Kajol on her Fairness : तू एवढी गोरी कशी झाली? काजोलच्या उत्तराने प्रश्न विचारणाऱ्याची बोलती बंद...

तिची छोटी कारकीर्द असूनही, रोझीने अनेक सीमा तोडल्या, विशेषत: अशा काळात जेव्हा स्त्रियांसाठी कलाकार बनणं वाईट मानले जात होतं. त्यांच्या हयातीत चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल तिचं कधीही कौतुक झाले नाही, परंतु तिची कथा आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

आज आपला देश जातिव्यवस्थेच्या दुष्ट चक्रातून मुक्त झाला असला तरी एक काळ असा होता जेव्हा लोकांनी या क्रूर प्रथेचे चटके सोसले आणि ही माणसं त्यातून तावून सुलाखुन बाहेर पडली. रोजीने तिच्या जगण्याचे क्रूर अनुभव घेतले आणि तिची कारकिर्द अजरामर झाली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com