बेळगाव-खानापूर रोडवर भीषण अपघात युवकाचा जागीच मृत्यू

या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपाशेजारी असणाऱ्या वळणावर कुडाळहून मालवणच्या दिशेने येणाऱ्या मासे वाहतूक गाडीला जोरदार धडक दिली.
Youth died on spot after hitting fish transport tempo at Malvan
Youth died on spot after hitting fish transport tempo at MalvanDainik Gomantak

मालवण : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून आज सकाळी चौके नेरुरपार मार्गे बेळगाव-खानापूर येथे दुचाकी ने जाणाऱ्या युवकाचा अपघात झाला. या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपाशेजारी असणाऱ्या वळणावर कुडाळहून मालवणच्या दिशेने येणाऱ्या मासे वाहतूक गाडीला जोरदार धडक दिली.

या अपघातात डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. अशोक धुळू जंगले वयवर्ष 23 रा. बेळगाव खानापूर अशी या मृत युवकाची प्राथमिक माहिती आहे. मालवण येथे गवंडी कामानिमीत्त राहत असणार अशोक धुळू जंगले हा युवक आज सकाळी दुचाकीने चौके नेरुरपार मार्गे बेळगाव येथे जात असताना सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चौके नारायणवाडी पेट्रोल पंपनजीक आला या पेट्रोल पंराजवळ एक वळणदार रस्ता आहे. आणि याच वळणावर कुडाळवरुन मालवणला मासे वाहतूक करणारा चालक संदिप देसाई यांच्या गाडीने दुचाकीच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली.

Youth died on spot after hitting fish transport tempo at Malvan
रायगड मधील पर्यावरण अनं पर्यटन सक्षम होणार

हा अपघात एवढा जोरदार झाला की, युवकाचा डोक्यात हेल्मेट असूनही मृत्यू झाला. डांबरी रस्त्यावर पडल्याने युवकाच्या डोक्याला जोरदार मार त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची खबर मिळताच चौके येथील व्यावसायिक संतोष गावडे, आणि त्यांचे सहकारी घटानास्थली पोहचले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुला जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. मालवण पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे आणि त्यांच्या सोबत असलेल्या कॉंस्टेबल्सनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृत अशोक धुळू जंगले या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चौके आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com