Weather Update: उन्हाळ्याची चाहूल, तापमानात 15 फेब्रुवारीनंतर वाढ होणार असल्याचा अंदाज

15 फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रातील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती मिळतेय.
Weather Update
Weather UpdateDainik Gomantak

Maharashtra Weather Update: काल गोवा हवामान विभागाने येत्या दोन- तीन दिवसांत राज्यातील तापमानाचा पारा वाढणार असल्याचे सांगितले आहे. मागील दोन दिवसांत गोव्यात पहाटेच्यावेळी धुकं अनुभवायला मिळालं.

असूनही फेब्रुवारी महिन्यातील अवघे पंधरा दिवस संपलेले असताना आतापासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

त्यातच 15 फेब्रुवारीनंतर शेजारच्या महाराष्ट्र राज्यातील तापमानात देखील वाढ होणार असल्याची माहिती मिळतेय. मुंबईतील थंडी गायब झाली असून किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे.

मुंबईत कालच्या तुलनेत 7.6 अंशांनी तापमान वाढलं आहे. मुंबईत रविवारी तापमान कमाल तापमान 36 अंशांवर गेले होते.

Weather Update
Maharashtra: मुंबईतील मालाड परिसरात भीषण आग,आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

सध्या औरंगाबादमध्ये 10.2 अंश सेल्सिअस, नाशिक 10.9, पुणे 10.6, महाबळेश्वर 13.4, बारामती 12.8 आणि जळगावात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मात्र 15 फेब्रुवारीनंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com