Maharashtra: मुंबईतील मालाड परिसरात भीषण आग,आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मुंबईतील मालाड परिसरातील झोपड्यांना भीषण आग लागली आहे.
Maharashtra| Mumbai fire
Maharashtra| Mumbai fireDainik Gomantaj
Published on
Updated on

मुंबईतील मालाड परिसरात मोठी घटना घडली आहे. येथे झोपड्यांना भाषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

या आगीत जवळ जवळपास 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ही भीषण आग मालाड पुर्व जामरुशी नगर मध्ये लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि तेथुन ती पसरली. पण आगीचे कराण अस्पष्ट आहे. घरेलू गॅस सिलेंडर स्फोट आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com