Mumbai: विना हेल्मेट दुचाकी चालवणं पडू शकते महागात

विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यां लोकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत
 Mumbai Traffic Rules
Mumbai Traffic Rules Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईत विना हेल्मेट दुचाकी चालवणं आता महागात पडू शकते. कारण विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत. विना हेल्मेट गाडी चालवल्याबद्दल पूर्वी दुचाकीस्वाराला फक्त दंड भरावे लागत होते. पण आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) पाठवून त्याचे लायसन्स रद्द करण्याची मोहीम मुंबई पोलिसांनी (Mumbai) सुरू केली आहे. हेल्मेट न घातल्यामुळे मुंबईत होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावा लागले आहे.या कारणामुळे पोलिसांनी या मोहिमेला सुरुवात केली आहे.

पोलिस उपायुक्त राज टिळक रौशन यांनी मुंबई पोलिसांच्या अधिकृत पेजवर शेअर केलेल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितले आहे, हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक मानक कार्यप्रणाली (SOP) लागू करण्यात आली असून जे लोक या नियमांचे उल्लंघन करतील त्यांना योग्य तो धडा शिकवला जाणार आहे.

 Mumbai Traffic Rules
फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसे साक्षीदार म्हणून पोलिसांसमोर हजर

मुंबईमध्ये जर एखादा वाहनचालक विना हेल्मेट आढळला तर त्याचं दंड केला जाईल, नंतर त्याचे लायसन्स आरटीओद्वारे रद्द केल्या जाईल. याशिवाय वाहतूक नियमाचे उल्लंघन करणार्‍या लोकांना वाहतूक पोलिस चौकीत पाठवले जाणार आहे. तिथे त्या लोकांना वाहतूक नियमांचे धडे दिले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com