CM Eknath Shinde: 50 आमदारांनी जी भूमिका घेतली तीच खासदारांनी...'

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. उध्दव ठाकरे यांच्या हातातून पहिल्यांदा सत्ता गेली, तर आता पक्ष वाचवण्याची धडपड सुरु झाली आहे. ज्यामध्ये रोज नव-नवे ट्विस्ट येत आहेत. आता एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली. शिवसेनेच्या (Shiv Sena) प्रमुख नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. याच पाश्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या घडामोडीवर भाष्य केले. महाराष्ट्र सदनमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली.

Chief Minister Eknath Shinde
Maharashtra Politics: 'शिवसेना हा गट नसून...', संजय राऊतांचा घणाघात

एकनाथ शिंदे म्हणाले, 'शिवसेनेच्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र सुपुर्द केले आहे. त्याचबरोबर उद्या ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांचं मी मनापासून स्वागत करतो.'

Chief Minister Eknath Shinde
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, रामदास कदमांची शिवसेनेला सोडचिठ्ठी

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ''शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. शिवसेना भाजप (BJP) युतीला महाराष्ट्रात पसंद केलं जात आहे. आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय तातडीने घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय सरकार घेत आहे. महाराष्ट्रातील सरकारला पूर्णपणे केंद्र सरकारने पूर्ण पाठिंबा दिला आहे. या 12 खासदारांनी बाळासाहेबांच्या विचाराचं स्वागत केलं आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com