सच्चा गणेशभक्त! लालबाग राजाच्या दर्शनासाठी 770 किमी केला पायी प्रवास

लालबाग राजाच्या दर्शनासाठी गुजरात ते मुंबई पायी प्रवास
समीर जगदीशभाई दतानी
समीर जगदीशभाई दतानीदैनिक गोमन्तक

भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, विशेषत: महाराष्ट्र, गोवा आणि इतर ठराविक राज्यात या दिवसांत मोठा उत्सव पहायला मिळतो. सध्या सर्व ठिकाणी गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. पुणे, मुंबई याठिकाणी काही मानाचे गणपती आहेत, ज्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक अनेक ठिकाणावरून हजेरी लावत असतात. जसं पुण्याचा दगडूशेठ (Dagadushet) गणपती प्रसिद्ध आहे तसाच, मुंबईतील लालबागचा राजा (Lalbaughcha Raja) प्रसिद्ध आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवसापासून गर्दी पहायला मिळते.

लालबागच्या राजावर श्रद्धा असलेले अनेक गणेशभक्त आहेत. असाच एक गुजरातमधील गणेशभक्त आहे, ज्याने लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गुजरात ते मुंबई असा 770 किमी केला पायी प्रवास केला आहे. समीर जगदीशभाई दतानी (वय 44) असे या शिक्षण निरीक्षक असलेल्या गणेशभक्ताचे नाव आहे. गुजरात मधील जुनागढ येथून समीर यांनी 13 ऑगस्ट रोजी चालण्यास सुरूवात केली. आणि 06 सप्टेंबर रोजी ते मुंबईतील मीरा रोड येथे पोहचले. हे अंतर पार करण्यासाठी समीर दतानी यांनी 25 दिवस लागले.

समीर जगदीशभाई दतानी
मडगाव येथील अग्निवीर भरतीला युवकांचा भरभरुन प्रतिसाद

"कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सवावर बंधने होती. मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोना काळात नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. या लोकांपेक्षा माझे दु:ख काहिच नाही. गेल्या दोन वर्षात गणपतीचे दर्शन घेता आले नाही. यावेळी मी देवाकडे कोरोना हद्दपार करण्यासाठी आणि लोकांना समृद्धी देण्याची प्रार्थना केली," असे समीर दतानी म्हणाले.

दररोज 30 ते 32 किलोमीटर प्रवास करायचो दिवसा प्रवास आणि रात्री आराम करून मी हा प्रवास पूर्ण केला. वाटेत लोकांनी मला सहकार्य केले तसेच, अनेकांनी आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या असे समीर यांनी सांगितले आहे.

समीर जगदीशभाई दतानी
CM Pramod Sawant- लैंगिक अत्याचार बहुतांशी ओळखीच्या लोकांकडून

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com