Kuldeep Yadav: कमबॅक करताच चालली चायनामनची जादू! एकाच षटकात दोन विकेट्स घेत गाठली स्पेशल 'फिफ्टी'

WI vs IND, 3rd T20I: कुलदीप यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात शानदार कामगिरी करत चहलचा विक्रमही मोडला आहे.
Kuldeep Yadav
Kuldeep YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Kuldeep Yadav breaks Yuzvendra Chahal T20I Record:

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात टी20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी खेळवण्यात आला. हा सामना गयानामधील प्रोविडन्स स्टेडियमवर खेळवला गेला. दरम्यान, या सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. याबरोबरच त्याने युजवेंद्र चहलचा खास विक्रमही मोडला आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ पहिल्यांदा गोलंदाजीसाठी उतरला. वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंग आणि काईल मेयर्स यांनी चांगली सुरुवात केली होती.

दोघांनीही सलामीला अर्धशतकी भागीदारी केली. पण मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यांनी धावांवर अंकुश लावला होता. अक्षर पटेलने 8 व्या षटकात मेयर्सला 25 धावांवर बाद केले. त्यानंतर 11 व्या षटकात जॉन्सन चार्ल्सला 12 धावांवर कुलदीप यादवने पायचीत केले.

Kuldeep Yadav
Kuldeep Yadav Video: खतरनाक! कुलदीपच्या जादूई बॉलनं कॅरे क्लीन बोल्ड, चाहत्यांसह दिग्गजही थक्क

कुलदीपच्या एकाच षटकात दोन विकेट्स

यानंतर निकोलस पूरन आणि ब्रेंडन किंग डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत होत. पण याचवेळी कुलदीप यादवने टाकलेले 15 वे षटक महत्त्वाचे ठरले. या षटकातील पहिल्याच चेंडूवर कुलदीपने धोकादायक निकोलस पूरनला २० धावांवर माघारी धाडले. यष्टीरक्षक संजू सॅमसनने त्याला चपळाईने यष्टीचीत केले.

त्यानंतर याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर ब्रेंडन किंगला कुलदीपने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत माघारी धाडले. ब्रेंडन किंगने 42 धावांची खेळी केली. या विकेटबरोबर कुलदीपने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्स पूर्ण केले.

त्यामुळे कुलदीप आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने 30 व्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील 29 व्या डावात 50 विकेट्सचा टप्पा गाठला. याआधी भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहलने 34 डावात त्याच्या 50 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.

Kuldeep Yadav
WI vs IND, 3rd T20I: मॅचपूर्वी सावळा गोंधळ! मैदानातून '30 यार्ड सर्कल'च गायब, वाचा नक्की झालं काय

पॉवेलचा फिनिशिंग टच

पण, यानंतर कर्णधार रोव्हमन पॉवेलने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. त्याने आक्रमक फलंदाजी केली. तसेच भारतासाठी 19 वे षटक महागडे ठरले. अर्शदीप सिंगने गोलंदाजी केलेल्या या षटकात 17 धावा निघाल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 बाद 159 धावा केल्या. पॉवेल 40 धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून कुलदीप यादवने 4 षटकात 28 धावांत 3 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com