World Cup 2023: ‘मला लाज वाटतेय…,’ वसीम अक्रमने रोहित शर्मावर आरोप करणाऱ्या माजी क्रिकेटपटूला फटकारले

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले आहे.
Wasim Akram
Wasim AkramDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले आहे. मात्र, हेच प्रदर्शन बहुतेक पाकिस्तान्यांना बोचत आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बेताल वक्तव्य करत सुटले आहेत.

दरम्यान, गुरुवारी आणखी एक माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनी रोहित शर्माच्या टॉस करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मूर्खपणाचे वक्तव्य केले.

याबाबत आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्याने हे वक्तव्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. हे ऐकल्यानंतर मला लाज वाटत असल्याचे तो म्हणाला. यावर शोएब मलिकनेही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, ए स्पोर्ट्सशी बोलताना वसीम अक्रमने आपल्याच देशाच्या माजी क्रिकेटपटूवर टीका केली. यावर मी भाष्य करु इच्छित नाही असे तो म्हणाला. तो पुढे म्हणाला की, ''नाणे कुठे पडेल कुणास ठाऊक? हे केवळ स्पॉन्सरशिपच्या उद्देशाने केलेले वक्तव्य आहे. मला लाज वाटत आहे. मला यावर अजून काही बोलायचे नाही.''

Wasim Akram
World Cup 2023: शानदार शमी! सेमी-फायनलमध्ये 7 विकेटस घेत 'या' 7 रेकॉर्ड्सलाही घातली गवसणी

सिकंदर बख्त यांचे बेताल वक्तव्य

दरम्यान, एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना सिकंदर बख्त यांनी हे बेताल वक्तव्य केले. बख्त म्हणाले की, नाणेफेकीदरम्यान रोहित शर्मा नाणे खूप दूर फेकतो, त्यामुळे विरोधी कर्णधाराला ते दिसत नाही. पण हे वक्तव्य करण्यापूर्वी सिकंदर बख्त नाणेफेकीच्या वेळी सामनाधिकारीही उपस्थित असतात हे विसरले असावेत.

सहसा, नाणेफेकीदरम्यान, सामनाधिकारी हेड आले की टेल पाहतात. त्यामुळे सिकंदर बख्त यांच्या या वक्तव्याची बरीच चर्चा होत असून त्यांच्यावर जोरदार टीकाही होत आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या विजयानंतर सिकंदर यांनी हे वक्तव्य केले आहे. भारताने (India) चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणे कदाचित पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना पचनी पडलेले दिसत नाही.

Wasim Akram
World Cup 2023: जळायचं तरी किती... आता रोहितच्या टॉसिंग पद्धतीवरही पाकिस्तानी क्रिकेटपटूने केला प्रश्न उपस्थित

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ

जिथे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इतर देशांवर वक्तव्ये करण्यात मग्न आहेत. त्यांच्याच देशाच्या क्रिकेट बोर्डात गोंधळ सुरु आहे. पहिल्यांदा मुख्य सिलेक्टर्स इंझमाम उल हकने राजीनामा दिला. त्यानंतर कर्णधार बाबर आझमनेही (Babar Azam) संघाचे कर्णधारपद सोडले. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या साखळी टप्प्यातही पाकिस्तानने नऊ पैकी पाच सामने गमावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com