Vijay Merchant Trophy: गोव्याची मजबूत पकड नंतर ढिली

3 बाद 19 वरून बंगालच्या 6 बाद 269 धावा
Vijay Merchant Trophy:
Vijay Merchant Trophy: Dainik Gomantak
Published on
Updated on

Vijay Merchant Trophy 2023: विजय मर्चंट करंडक 16 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याने सुरवातीलाच जोरदार धक्के देत बंगालची पकड केली, परंतु नंतर त्यांचा जोर ओसरला, त्यामुळे 3 बाद 19 वरून प्रतिस्पर्ध्यांनी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर 6 बाद 269 अशी समाधानकारक स्थिती गाठली.

सुरत येथील सी. के. पिठावाला स्टेडियमवर सोमवारपासून तीन दिवसीय सामन्याला सुरवात झाली. बंगालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र गोव्याच्या समर्थ राणे व शमिक कामत यांनी त्यांना त्रासात टाकले.

Vijay Merchant Trophy:
Indian Super League Football: घरच्या मैदानावर एफसी गोवा वरचढ; सात सामने अपराजित राहण्याचा साधला पराक्रम

कर्णधार आशुतोष कुमार (52), ऋतजित भट्टाचारजी (87) व अभिपराय बिश्वास (नाबाद 58) यांच्या अर्धशतकांमुळे बंगालला पहिल्या डावात सावरता आले.

आशुतोष व ऋतजित यांनी चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. नंतर पाचव्या विकेटसाठी ऋतजित व आयुष घोष (34) यांनी 64 धावांची भर टाकली. दिवसअखेर अभिपराज व अव्रदीप बिश्वास (26) यांनी सातव्या विकेटसाठी 69 धावांची अभेद्य भागीदारी केली होती.

Vijay Merchant Trophy:
भारताला WC जिंकून देणाऱ्या गोलंदाजापासून ते 6 षट्कार खाणाऱ्या गोलंदाजापर्यंत या दिग्गजांनी यंदा घेतली निवृत्ती

संक्षिप्त धावफलक

बंगाल, पहिला डाव ः 93 षटकांत 6 बाद 269 (आशुतोष कुमार 52, ऋतजित भट्टाचारजी 87, आयुष घोष 34, अभिपराय बिश्वास नाबाद 58, अव्रदीप बिश्वास नाबाद 26, समर्थ राणे 14-2-47-2, शमिक कामत 10-1-18-1, चिगुरुपती व्यंकट 5-1-16-0, संचित नाईक 18-1-55-2, द्विज पालयेकर 30-6-71-0, ओम खांडोळकर 4-0-16-0, आराध्य गोयल 12-1-40-1).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com